ETV Bharat / state

'यूपीएच्या पुनर्गठणाची गरज; शरद पवारांनी नेतृत्व केल्यास अनेक पक्ष एकत्र' - खासदार संजय राऊत बातमी

सध्या देशात एनडीएचे अस्तित्व दिसत नाही, अनेक पक्ष बाहेर पडले आहेत. त्याच प्रमाणे युपीएचीदेखील परिस्थिती झाली आहे. त्यासाठी युपीएचे पुनर्रगठण व्हायला हवे, आणि त्याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी करायला हवे, तर अनेक भविष्यात अनेक पक्ष एकत्रित येतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र हे काँग्रेसच्या सहमती शिवाय शक्य नसल्याचेही ते म्हणाले

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Mar 1, 2021, 3:40 AM IST

Updated : Mar 1, 2021, 1:06 PM IST

औरंगाबाद - औरंगाबाद - यूपीएचे पुनर्गठन करणे गरजेचे आहे. त्यासाठी शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन त्या आघाडीचे नेतृत्व करायला हवे, कारण देशातील अनेक प्रादेशिक पक्ष सध्या काँग्रेसच्या नेतृत्वात काम करायला तयार नाहीत, असे परखड मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. या नवीन आघाडीचे भविष्य काँग्रेसच्या त्याग आणि उदारतेवर अवंलबून असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

राऊत पुढे म्हणाले, सध्या देशात एनडीएचे अस्तित्व दिसत नाही, अनेक पक्ष बाहेर पडले आहेत. त्याच प्रमाणे युपीएचीदेखील परिस्थिती झाली आहे. त्यासाठी युपीएचे पुनर्गठण व्हायला हवे, आणि त्याचे नेतृत्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी करायला हवे, तर अनेक भविष्यात अनेक पक्ष एकत्रित येतील, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मात्र हे काँग्रेसच्या सहमती शिवाय शक्य नाही.

यूपीएचे पुनर्घटन केलं पाहिजे

महाराष्ट्रातून यूपीएला एक नव रूप मिळू शकते. शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे. त्यासाठी काँग्रेसला मनाचा मोठेपणा आणि त्याग करावा लागेल. त्यावेळी अनेक पाऊले उचलली जाऊ शकतात. देशपातळीवर प्रादेशिक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर या प्रक्रियेला वेग येईल, अशी अपेक्षा संजय राऊत यांनी औरंगाबादेत व्यक्त केली.

संजय राठोड यांचा राजीनामा नैतिकतेला धरून

संजय राठोड यांचा राजीनामा नैतिकतेला धरून आहे. अशा पद्धतीने राज्याच्या मंत्र्यांवर आरोप होत आहे. तपास कार्यात मदत असावी, यासाठी हा राजीनामा आहे. खरंतर आरोप सिद्ध होण्याची राजीनामा देणे योग्य नाही. मात्र, नैतिकतेचा विचार करूनच हा राजीनामा दिला असल्याचे मत संजय राऊत यांनी औरंगाबाद येथे व्यक्त केले.

बोलताना संजय राऊत

पोलिसांवर संशय घेणे योग्य नाही

पूजा चव्हाण आत्महत्या किंवा हत्या याबाबत तपास करण्यात महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा सक्षम आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांबाबत केलेले वक्तव्य म्हणजे त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्यासारखा आहे. पोलिसांवर विनाकारण दबाव आणला जात आहे. सरकारचा आदेश मानणे हे पोलिसांचे काम आहे. मात्र. पोलिसांनी आपला आत्मा हा विकलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेणे योग्य नाही, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

तर आम्ही विरोधी पक्षासोबत आंदोलनात उतरू

देशाच्या अनेक राज्यातील विरोधी पक्ष हे इंधन दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे. मात्र, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष इंधन दरवाढीविरोधात काहीच बोलत नाही. त्यांनीही इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करावीत. त्यांनी आंदोलन केले तर आम्हीही विरोधी पक्षासोबत आंदोलनात उतरू, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा - 'निवडणूक आयोग दिल्लीच्या आदेशावर चालत आहे'

Last Updated : Mar 1, 2021, 1:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.