छत्रपती संभाजीनगर Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज राज्याच्या मंत्रीमंडळाची बैठक आहे. तब्बल सात वर्षांनंतर मराठवाड्यात बैठक होत असून, या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळातील सर्व मंत्री आले आहेत. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
बैठक कमी खर्च करून घेता आली असती : 'राज्यात दोन भामटे आणि एक ठग यांची युती आहे. मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असताना अय्याशीसाठी खर्च सुरू आहे', हे दुर्दैवी असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली. 'आम्ही म्हणत नाही की पुलाखाली किंवा रस्त्यावर बैठक घ्या. मात्र हीच बैठक कमी खर्च करून घेता आली असती. हॉटेलमध्ये सूट मिळाली नाही म्हणून काही मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना झापलं', असं देखील संजय राऊत म्हणाले.
मी पत्रकार परिषदेला जाऊ शकतो : विरोधकांना प्रश्न विचारण्याऐवजी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारावे असं आमचं म्हणणं असल्याचं संजय राऊत म्हणाले. 'मला काही पत्रकारांनी विचारलं, तुम्ही पत्रकार परिषदेला जाणार का? त्यावर मला जर वेळ भेटला तर प्रश्न विचारणार, असं उत्तर दिलं. मी गेलो तर गोंधळ होईल म्हणून मी जाणार नाही. पण मी जेष्ठ पत्रकार आणि संपादक आहे. त्यामुळे गरज पडली तर मी जाऊ पण शकतो, असं संजय राऊत यांनी नमूद केलं
बॅनरवर क्रांतिकारकांच्या ऐवजी नेत्यांचेच फोटो : 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा केला जातोय. मात्र शहरात जी काही बॅनरबाजी केली जातं आहे ती योग्य नाही. शहरात अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले, मात्र त्यावर क्रांतिकारकांच्या ऐवजी नेत्यांचेच फोटो अधिक झळकत आहे. 'त्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी स्वागत', असं लिहिलंय. क्रांतीकारांच्या जागी या ठगांचे फोटो कशाला', अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी केली. 'इंडिया आघाडीचा खर्च कशा झाला असं विचारता. मात्र तो खर्च सरकारी तिजोरीतून झाला नाही', असं देखील संजय राऊत यांनी सांगितलं.
पंतप्रधानांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली का : बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत सैन्याचे तीन अधिकारी व एक जवान झाले. यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजपाला प्रश्न केला. सैन्याचे चार अधिकारी शहीद झाले. मात्र त्यांना भाजपानं किंवा पंतप्रधानांनी श्रद्धांजली वाहिली का? ते स्वतः वर फुले उधळत बसले. मात्र आम्ही अमानुष नाही. मंत्रिमंडळाची बैठक सुरू असताना क्रांती चौक येथे आम्ही श्रद्धांजली वाहणार आहोत, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
हेही वाचा :