औरंगाबाद - जिल्ह्यामध्ये गेल्या दोन, तीन महिन्यापासून ओव्हरलोड, टॅक्स न भरणारी वाहने, वाहतुकीच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई करण्यात येत आहे. दंड न भरणारी वाहने जप्त करण्यात येत असल्यामुळे आरटीओ कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते वाहन चाचणीच्या ट्रॅकपर्यंत जप्त वाहने अस्ताव्यस्त उभी करण्यात आली आहे.
हेही वाचा - चीन ओपन : जपानचा केंटो मोमोटा विजेता
या वाहनांच्या जागाव्याप्तीमुळे विविध कामानिमित्त येणाऱ्या वाहनधारकांना आपली वाहने कार्यालयाचा आवारात जागा मिळेल तिथे उभी करावी लागत आहे. शिवाय, दुचाकी आणि चारचाकी वाहन परवान्यासाठी चाचणी घेण्यात येणाऱ्या ट्रॅक जवळही अशीच जप्त वाहने उभी करण्यात आली आहेत. त्यामुळे परवान्यासाठी अर्ज करणाऱ्या लोकांची चाचणी अयोध्यानगरीच्या मैदानावर घ्यावी लागत आहे.