ETV Bharat / state

Restrictions On Ajantha Bank : अजिंठा बँकेवर निर्बंध येताच खातेदाराने केला आत्महत्येचा प्रयत्न - अजिंठा बँकेवर आरबीआयचे निर्बंध

संभाजीनगरमध्ये अजिंठा बँकेच्या खातेदारानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर आरबीआयनं निर्बंध लावल्यानंतर ही घटना घडली आहे. (RBI restrictions on Ajantha Bank)

Restrictions On Ajantha Bank
Restrictions On Ajantha Bank
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 10:50 PM IST

सुभाष झांबड यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : आदर्श नागरी पतसंस्थेनंतर अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव बँकेवर आरबीआयनं निर्बंध लावल्याची माहिती समोर आली. ही बातमी समोर येताच बुधवारी खातेदारांनी बँकेच्या सर्व शाखांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली. खात्यावरील रक्कम कधी मिळणार याबाबत त्यांनी बॅंकेला विचारणा केली. मात्र, त्यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं एका खातेदारानं बँकेतच पेट्रोल आणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. वेळीच कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनी हस्तक्षेप केल्यानं पुढील होणार अनर्थ टळला आहे.(Ajantha Nagari Cooperative Bank)

ग्राहकाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 29 ऑगस्ट रोजी अजिंठा नागरी सहकारी बँकेवर निर्बंध लावण्यात येत असल्याची माहिती दिली. त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच खातेदार, ठेवीदारांनी बँकेत गर्दी केली होती. त्यात जाधव मंडी येथील मुख्य शाखेत हेमंत गंगवाल या ठेवीदारानं सोबत पेट्रोल आणून अंगावर ओतून घेतलं. त्यामुळं बॅंकेत एकच गोंधळ उडाला. ठेवीदार आत्महत्येचा प्रयत्न करत असताना बँक कर्मचारी, नागरिकांनी त्याला अडवलं. त्यामुळं पुढील मोठा अनर्थ टळला. त्यावेळी बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी खातेदाराची भेट घेत त्याची समजूत काढली. बॅंक सर्वांचे पैसे परत करणार असल्याचं आश्वासन झांबड यांनी दिलं. त्यामुळं नंतर खातेधारक घरी गेले. जमा झालेल्या सर्व नागरिकांना आश्वासन दिलं, असलं तरी आदर्श बँक बाबतचा अनुभव पाहता आपले पैसे मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पैसे परत करू : आरबीआयतर्फे अजिंठा नागरी सहकारी बँकेवर २९ ऑगस्ट रोजी निर्बंध आणण्यात आले आहेत. बँकिंग नियमितीकरण कायदा 1949 च्या कलम 35, कलम 1 मधील उपकलम 1, कलम 56 नुसार कडक निर्बंध घातले आहेत. आरबीआयच्या मान्यतेशिवाय कोणत्याही कर्जाचं नूतनीकरण बॅंकेला करता येणार नाही. येणाऱ्या सहा महिन्यात बँकेचे व्यवहार पाहून पुढील निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे. मात्र, कोणाचेही पैसे बुडणार नाहीत असं आश्वासन बँकेच्या अध्यक्षांनी दिलं. बँकेवर निर्बंध लावण्यात आले असून, त्याची सर्वस्वी जबाबदारी आम्ही घेत आहोत. बँकेतील सर्व ठेवीदारांचे पैसा परत देण्यात येईल. पंचवीस वर्षापासून बँकचे व्यवहार चांगले आहेत. आतापर्यंत कुठलेही आरोप नव्हते. कुठलाही घोटाळा झाला नाही, त्यामुळे दंडही लागलेला नाही. कारवाईबाबत नियमानुसार आम्ही त्याचं पालन करू. येत्या सहा महिन्यात आम्ही बँकचे व्यवहार पूर्ववत करू. पाच लाखापर्यंत विमा काढलेला असून जवळपास 95 टक्के खातेदारांना पैसे परत मिळणार आहेत. ज्या लोकांची अडचण आली त्यांना वैयक्तिकरित्या त्यांचे पैसे परत करू, असं आश्वासन बँकेचे अध्यक्ष सुभाष झांबड यांनी दिलंय.

हेही वाचा -

  1. Adarsh Bank Scam : आदर्श बँक घोटाळ्याचा पहिला बळी, चिंताग्रस्त ठेवीदारांने संपवले जीवन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.