औरंगाबाद - महावितरणकडे रोहित्र असतानादेखील शेतकऱ्यांना मिळत ( transformers demand of farmers in Aurangabad ) नाही. सोमवारपर्यंत खराब रोहित्र बदला. अन्यथा, आम्ही स्वतः रोहित्र उचलून नेऊ, असा इशारा भाजप आमदार प्रशांत बंब यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ( MLA Prashant Bambs warning to MSEDCL ) दिला आहे.
आमदार प्रशांत बंब यांनी घेतली झडती
आमदार प्रशांत बंब म्हणाले, की एकीकडे शेतकऱ्यांचे रोहित्र जळत आहेत. तर महावितरण रोहित्र नसल्याचे कारण देत महावितरण अधिकारी रोहित्र बदलण्यास नकार देत आहेत. याच कारणामुळे महावितरणच्या गोदमावर छापा टाकला. तिथे शेकडो रोहित्र पडून असल्याचे दिसून ( transformers in Chikalthana godown ) आले, अशी माहिती आमदार बंब यांनी दिली. महावितरणचे चिकलठाणा भागात गोदाम आहे. या ठिकाणी शेकडो रोहित्र या ठिकाणी पडलेले आहेत. यातील अनेक रोहित्र 3 वर्षांपासून पडून आहेत. अनेकांची वॉरंटीसुद्धा संपली आहे. मात्र, तरीदेखील शेतकऱ्यांना रोहित्र देण्यात येत नाहीत. एकीकडे शेतकऱ्यांचे रोहित्र जळत आहेत. नियमानुसार शासनाने रोहित्र बदलून दिले पाहिजे, असा नियम आहे. मात्र, तरीसुद्धा तसे होत नाही. सरकार शेतकऱ्यांचा छळ करत आहे, असा आरोप भाजप आमदार प्रशांत बंब यांनी ( MLA Prashant Bamb Slammed gov ) केला आहे.
हेही वाचा-Accused Arrested: कन्नड येथे मुख्याध्यापकावर हल्ला करणाऱ्याला पुण्यातून अटक
मुबलक ऑइल असूनही मिळेना
फक्त रोहित्र नाहीत तर रोहित्रला लागणारे तेलदेखील येथे पडून आहे. मात्र, तेही दिले जात नसल्याने रोहित्र नादुरुस्त होत आहेत. याकडे महावितरण लक्ष देत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी मुंबई मुख्य कार्यालयाकडे बोट दाखविले जाते. शेतकऱ्यांविषयी कोणालाच काळजी नाही. रोहित्र नसल्याने शेतकऱ्यांची पिक खराब होत आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई द्या. आमच्या पैशांनी रोहित्र बदलून घेऊ, असा इशारा आमदार प्रशांत बंब यांनी दिला.
हेही वाचा- भंगार विक्रेत्याचा सरकारला 200 कोटींचा गंडा, अनेक व्यवसायिक कटात शामिल
योजनेतील रोहित्र वापरण्याकरिता मुंबई कार्यालयाची लागते परवानगी-
गोदामात असलेले रोहित्र दुसऱ्या योजनेचे आहेत. ते योजने व्यतिरिक्त लावायचे असल्यास मुंबई कार्यालयाची परवानगी लागते, अशी माहिती महावितरण अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी दिली आहे.