ETV Bharat / state

नवाब मलिक यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचा आरोप

मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांचे नातेवाईक आता त्रस्त झाले आहेत. रोज होणाऱ्या आरोपांना कंटाळून वानखेडे यांच्या नातेवाइकांनी मुकुंदवाडी पोलिसात ॲट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

समीर वानखेडे यांचे नातेवाईक
समीर वानखेडे यांचे नातेवाईक
author img

By

Published : Nov 9, 2021, 8:36 PM IST

Updated : Nov 10, 2021, 6:54 AM IST

औरंगाबाद - नवाब मलिक यांच्या आरोपांमुळे समीर वानखेडे यांचे नातेवाईक आता त्रस्त झाले आहेत. रोज होणाऱ्या आरोपांना कंटाळून वानखेडे यांच्या नातेवाइकांनी मुकुंदवाडी पोलिसात ॲट्रॉसिटी कलमानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

नवाब मलिक यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचा आरोप

समीर वानखेडे यांच्या आत्याने दिली तक्रार...

मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या गुंफाबाई भालेराव या वृद्ध महिलेने समीर वानखेडे त्यांचा भाचा असल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील हे गुंफाबाई यांचे सख्खे मोठे भाऊ असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवाब मलिक रोज करत असलेल्या आरोपांमुळे इतर नातेवाईक त्रास देत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. नवाब मलिकांचे आरोप थांबतील आणि प्रकरण शांत होईल, असे वाटत होते. मात्र, मुख्य प्रकरण सोडून नवाब मलिक रोजच आरोप करत आहेत. खरंतर गरीब कुटुंबातील हा मुलगा असून मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने त्यांना शिक्षण घेत समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. मात्र, मंत्री मलिक यांच्या आरोपांमुळे समीर वानखेडेच नाही तर आम्ही देखील त्रस्त झालो असून नवाब मलिक यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी गुंफाबाई भालेराव यांनी मुकुंदवाडी पोलिसात केली आहे.

समीर वानखेडे यांनी वंशावळ पुरावा दिल्याचा दावा

मंंत्री नवाब मलिक यांनी आरोप केल्यानंतर समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई भालेराव यांनी त्यांच्या पूर्ण कुटुंबाची वंशावळ आणि त्यांच्या जातीचे दाखले हे पोलिसांकडे दिले आहेत. मात्र, मंत्री मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा केल्यामुळे सुनांचे कुटुंबीय आमच्यावर फसवणुकीचे आरोप करत असल्याचे गुंफाबाई यांनी सांगितले. त्यामुळे आता नाईलाजास्तव ही तक्रार देत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुस्लिम मुलीशी लग्न केले म्हणून एखाद्याची जात बदलू शकते, का असा प्रश्न समीर वानखेडे यांचे आतेभाऊ प्रमोद भालेराव यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा - अज्ञात वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार, भाऊबीजेनंतर बहिण-भाचीला सोडण्यासाठी निघाला होता भाऊ

Last Updated : Nov 10, 2021, 6:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.