ETV Bharat / state

तूर डाळीचे भाव कडाडले; 'हे' आहेत नवीन दर

केंद्र सरकारने साठवण क्षमता वढवल्याने व्यापारी त्याचा गैर फायदा घेत आहेत. व्यापारी चढ्या दराने डाळीची विक्री करत आहेत. यात ग्राहक भरडला जात आहे. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असली, तरी आज पर्यंत त्यासाठी यंत्रणा सज्ज नसल्याचे पहायला मिळेल. त्यामुळे, नवीन तूर येई पर्यंत तरी डाळीचे भाव वाढतील. अशी शक्यता शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. तूरडाळ सोबत इतर डाळींचे दर देखील वाढल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

author img

By

Published : Oct 8, 2020, 4:17 PM IST

तूर डाळीचे भाव कडाडले
तूर डाळीचे भाव कडाडले

औरंगाबाद- राज्यात तूर डाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मागील दहा दिवसांमध्ये जवळपास २५ रुपयांनी डाळीचे भाव कडाडले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात डाळीचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार आहे. पुढील दोन महिने तरी डाळीचे भाव आणखी वाढणार असल्याची शक्यता शेतकरी नेत्यांनी वर्तवली आहे.

प्रतिक्रिया देताना शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी

मागील वर्षी तुरीचे उत्पादन कमी झाले. त्यात आयात बंदी करण्यात आली आहे. त्यातच नवीन तूर बाजारात यायला अद्याप दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तुरीला नऊ हजारांचा भाव दिला असला, तरी शेतकऱ्यांकडे तूरच शिल्लक नसल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार नाही, असे मत शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकारने साठवण क्षमता वढवल्याने व्यापारी त्याचा गैरफायदा घेत आहेत. व्यापारी चढ्या दराने डाळीची विक्री करत आहेत. यात ग्राहक भरडला जात आहे. व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असली, तरी आज पर्यंत त्यासाठी यंत्रणा सज्ज नसल्याचे पहायला मिळेल. त्यामुळे, नवीन तूर येई पर्यंत तरी डाळीचे भाव वाढतील. अशी शक्यता शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. तूरडाळ सोबत इतर डाळींचे दर देखील वाढल्याने सर्वसामान्यांच्या जेवणातून डाळ गायब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

औरंगाबादमधील डाळींचे भाव

डाळीचा प्रकार, आजचे दर, कंसात जुने दर..

तूर १२० (९५)

चणाडाळ ८० (६६)

मुगडाळ ११० (९५)

मसुरडाळ ८० (७५)

हेही वाचा- नोकरी मिळवण्यासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्र; 259 जणांवर होणार गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.