ETV Bharat / state

लोकांनी मते मलाच दिली, मात्र ती माझ्यापर्यंत आली नाहीत; शेट्टींचा ईव्हीएमवर आक्षेप - suger factory

भाजपची साथ सोडल्याचा आपल्याला अजिबात पश्‍चाताप नाही, आजघडीला सगळ्यात जास्त बुडवेखोर साखर कारखानदार भाजपमध्ये असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सगळ्या छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात असे सांगितले.

शेट्टूींचा ईव्हीएमवर आक्षेप
author img

By

Published : Jun 12, 2019, 8:18 PM IST

औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत लोकांनी मते मलाच दिली होती मात्र, ती माझ्यापर्यंत आली नाहीत, असे म्हणत आपला पराभव ईव्हीएममुळे झाला असून दिलेली मते दुसऱ्या ठिकाणी गेल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. त्यांनी मराठवाडा, विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून आल्यानंतर औरंगाबादेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

भाजपची साथ सोडल्याचा आपल्याला अजिबात पश्‍चाताप नाही, आजघडीला सगळ्यात जास्त बुडवेखोर साखर कारखानदार भाजपमध्ये असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होऊ द्यायची नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सगळ्या छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात, असे आवाहन देखील शेट्टी यांनी केले. त्यासाठी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली असून लवकरच वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना देखील भेटणार असल्याचे राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Intro:Body:

vitthal

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.