छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत गुवाहाटी गाठले, इतकंच नाही तर त्यांना चाळीस आमदारांनी साथ दिली. या सगळ्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यासाठी शहरातील गायक राज मुंगसे यांनी एक गाण तयार केले. या गाण्यातून पूर्ण राजकीय परिस्थितीवर त्यांनी भाष्य केले. तितकच नाही तर काही ठिकाणी एकनाथ शिंदे गटावर टीका केली. या गाण्याची चर्चा सर्वत्र झाली, काही राजकीय मंडळींनी तर आपल्या समाज माध्यमांवर या गाण्याला प्रसारित केले. पाहता पाहता त्याला लाखो लोकांनी पाहिले, त्यामुळे शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
वकिलाच्या सल्ल्याने मोबाईल केला बंद: राज मुंगसे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर दानवे यांनी त्यांच्या वकिलाचा नंबर देऊन त्याला बोलण्यात सांगितले, वकिलांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र तोपर्यंत मोबाईल फोन बंद ठेवण्याच्या सूचना त्याला करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्यांनी आपला फोन बंद केला आणि तो आज्ञास्थळी निघून गेला. मात्र वकिलांच्या संपर्कात होता, बुधवारी त्याचा जामीन मंजूर झाला आणि तो थेट मुंबई येथे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात पोहोचला. तिथून त्याने रात्री छत्रपती संभाजी नगर गाठले आणि सकाळी माध्यमांवर त्याने आपली बाजू मांडली. मी अज्ञात घरी होतो त्याबाबत जर माहिती दिली तर पोलीस त्यांना देखील त्रास देतील असे मत राजमुंगसे यांना व्यक्त केले.
कुटुंबीयांना दिला त्रास: राज मुंगसे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर संभाजीनगर पोलिसांनी त्याचा तपास शहरात घेतला. वाळूज परिसरात राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली, इतकच नाही तर पोलिसी खाक्या दाखवण्याचा देखील प्रयत्न झाला. राज मुंसेचे जे मित्र आहेत त्यांना देखील त्याबाबत विचारणा करत मोबाईल लोकेशन द्वारे शोध घेण्यात आला. त्यामुळे आपल्याला फोन बंद करून ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता, मात्र या काळात वकिलांनी आपली प्रक्रिया केली आणि जामीन मंजूर करून घेतला असे मत राज मुंगसे यांनी व्यक्त केले. आजच्या काळात कलावंतांना अभिव्यक्त स्वातंत्र नाही का? असा प्रश्न त्यांनी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना दिलेले आहे. कलाकार आपल्या कलेतून एखाद्या परिस्थितीवर भाष्य करू शकतो. बेरोजगारी, गरिबी, उपासमारी अशा अनेक विषयांवर याआधी नाट्य सादर करत भाष्य केलेला आहे. मात्र अशा परिस्थितीत जी काही घडलेली परिस्थिती आहे आणि जे काही प्रचलित शब्द समाज माध्यमांवर फिरत आहेत. त्यांना एकत्र करून हे गाणं तयार केले होते, मात्र ते काही लोकांना लागले अशी टीका राज मुंगसे यांनी केले. इतकच नाही तर यापुढेही विद्रोही कलाकार असल्याने अशा विषयांवर भाष्य करत राहील असे देखील त्यांनी सांगितले.
हेही वाचा: Chatrapati Sambhajinagar News 50 खोके घेऊन चोर आले रॅप साँग म्हणणाऱ्या राज मुंगसेला अटक