छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) Rainfall in Marathwada: पुढील दोन दिवसात आणखी पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतीचे नुकसान भरून निघणार नसले तरी पिण्याच्या पाण्याची काहीशी अडचण दूर होण्याची (Crop damage in Marathwada) शक्यता निर्माण झाली आहे. ( Rain in Marathwada taluka) जून महिन्यात पावसाळा सुरू झाला तरी, मागील चार महिन्यात म्हणावं तसं पर्जन्यमान संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात झालं नाही. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली पिकं (Chhatrapati Sambhajinagar) वाया गेल्याने शेतकरी हतबल झाला. हवामान खात्याने अनेक वेळा अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असला, तरी मात्र पावसाने दडी (heavy rainfall in Aurangabad) दिल्याने यंदा मराठवाड्यात भीषण दुष्काळाचा सामना नागरिकांना करावा लागेल, अशी शक्यता वर्तवली गेली. त्यानुसार प्रशासनाने देखील अनेक उपाययोजना करायला सुरुवात केली; मात्र गणपती आगमनासह काही ठिकाणी पावसाला सुरुवात झाली आणि काही ठिकाणी चांगला पाऊस पडला. त्यात गौरी आगमनानंतर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या काही तालुक्यांमध्ये दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असंच म्हणावं लागेल.
पिकांचे नुकसान : जून महिन्यात पावसाळा सुरू झाला. त्यानंतर चांगला पाऊस पडावा अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र, निसर्गाचा लहरीपणा पुन्हा आडवा आला. मागील चार महिन्यात अत्यल्प पाऊस संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक तालुक्यांमध्ये झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मका, सोयाबीन अशा पिकांचं नुकसान झाल्याने केलेला खर्च देखील शेतकऱ्यांचा निघाला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सरकारी मदतीची अपेक्षा बळीराजाला लागली होती.
परतीच्या पावसाने दिलासा : परतीचा पाऊस चांगला पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार 19 सप्टेंबर नंतर पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आणि मागील दोन दिवसात चांगलं पर्जन्यमान मराठवाड्याच्या काही भागात पाहायला मिळालं. त्यात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि सिल्लोड या तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी पावसाने लावली. तर जालना जिल्ह्यातील भोकरदन, बीड जिल्ह्यातील पाटोदा, आष्टी, आंबेजोगाई, शिरूर कासार, केज या तालुक्यांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पिकांचं झालेलं नुकसान भरून निघणार नसलं तरी या पावसामुळे थोडाफार दिलासा मिळू शकतो, अशी शक्यता देखील वर्तवली जात आहे.
हेही वाचा: