औरंगाबाद - हर्सूल कारागृहात ( Harsul Prison of Aurangabad ) शिक्षा भोगत असलेल्या 45 वर्षीय कैद्याने शौचालयाच्या पाण्याच्या लोखंडी पाईपला रुमालाच्या साहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा ( Prisoner Committed Suicide ) प्रकार सोमवारी (दि. 7 फेब्रुवारी) पहाटे उघडकीस आला. या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
अशोक रमेश जाधव (वय 45 वर्षे, रा. सुरळी, ता. गेवराई, जि.बीड), असे मृत कैद्याचे नाव आहे. हर्सूल ठाण्यात मध्यवर्ती कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मृत अशोक जाधव हा बंदीवान होता. त्याने रविवारी मध्यरात्री 1 वाजून 49 मिनिटांनी जुने सर्क 16, बॅरेक 7 येथील शौचालयाच्या पाण्याच्या लोखंडी पाईपला रुमालाने गळफास घेतला. सकाळी करागृहातील कर्मचाऱ्यांना आरोपी हा लटकलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही - घटनेची माहिती तात्काळ कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. या घटनेची माहिती समजताच कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिकडे धाव घेतली. त्यास तपासून मृत घोषीत केले. या कैद्याच्या आत्महत्येचे ( Prisoner Committed Suicide ) कारण समजू शकले नाही. हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केल्यानंतर उपनिरीक्षक एस.के. चव्हाण अधिक तपास करत आहेत.
हेही वाचा - Accused Arrested: कन्नड येथे मुख्याध्यापकावर हल्ला करणाऱ्याला पुण्यातून अटक