ETV Bharat / state

औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू; डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप - औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

डॉ. अमीत गुंजाळ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी औरंगाबादेतील घाटी रुग्णालय चौकीचे पोलीस नाईक एम. डी. सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मा

औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Oct 28, 2019, 3:20 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील गंगापूर येथे प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ५ वाजता घडली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे गरोदर मातेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.

औरंगाबादेत प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू

आशमा हमीद शेख, असे मृत महिलेचे नाव आहे. तिला २६ ऑक्टोबरला शहरातील डॉ. अमित गुंजाळ यांच्या ओमसाई रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉ. गुंजाळ यांनी तिची प्रसुती केली. मात्र, प्रसुतीनंतर तिला जास्त रक्तस्त्राव सुरू झाला. तिचा रक्तदाब वाढला असल्याचे सांगून तिला औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

नातेवाईकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चौधरी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. मात्र, नातेवाईक मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. तसेच डॉ. अमीत गुंजाळ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी औरंगाबादेतील घाटी रुग्णालय चौकीचे पोलीस नाईक एम. डी. सोनवणे यांच्या तक्रारीवरून गुंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Intro:गंगापूर शहरात गरोदर मातेचा मृत्यू,डाॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे गरोदर मातेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.
डाॅक्टरवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक पोलिस ठाण्यात.
औरंगाबाद- गंगापुर शहरात पुन्हा एकदा बि ए एम एस डाॅक्टरने घेतला गरोदर मातेचा बळी गंगापूर तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट.
शहरातील ओमसाई हाँस्पीटल मधे 28 वर्षीय महीलेची प्रसुती झाल्यानंतर जास्त रक्त स्त्राव झाल्याने तीचा मृत्यू झाल्याची घटना 27 आँक्टोबंर रोजी पहाटे पाच वाजता घडली आशमा हमीद शेख असे महीलेने नाव आहे.Body:मिळालेल्या माहितीनुसार गंगापुर शहरातील नवीन बस स्टँड जवळ असलेल्या डॉ.अमीत गुंजाळ यांचे ओमसाई हाँस्पीटल मधे मन्सूरी काँलनी येथील आशमा हमीद शेख वय 28 वर्ष हीला प्रसुती करिता 26 आँक्टोबंर रोजी दाखल करण्यात आले होते डॉ अमीत गुंजाळ यांनी या महीलेची प्रसुती केली प्रसुती नंतर आशमास जास्त रक्त स्त्राव होत असल्याने डॉ. गुंजाळ यांनी महीलेच्या नातेवाईकांना सागींतले आशमा हीला रक्तदाब वाढला
आसुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला यावर नातेवाईकांनी तत्काळ घाटी रुग्णालयात घेऊन गेले असता रात्री अडीच वाजता दाखल केले परंतु ऊपचार चालू असतांना आशमा हीचा मृत्यू झाला या घटनेची माहिती गंगापुर पोलीसांना दिल्यावरुण पोलीस ऊपनिरीक्षक अर्जुन चौधर व कर्मचाऱ्यांनी घाटी रुग्णालयात जाऊन पंचनामा केला यामध्ये आशमाच्या प्रसुतीनंतर अती रक्त स्त्राव झाल्याचा पंचनामा पोलिसांनी केल्याचे सांगितले
आशमा हीच्यावर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात श्ववविच्छेदन करून मृतदेहास घेऊन नातेवाईक थेट गंगापुर पोलीस ठाणे गाठत जो पर्यंत डॉ अमीत गुंजाळ यांच्याविरोधात मनुष्य वधाचा गुन्हा दाखल होऊन अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह हलवणार असा पवित्रा घेत मोठा जमाव पोलीस ठाण्यात जमा झाला होता.Conclusion:मात्र पोलिसांनी आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी मृत आशमावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेऊन गेले या प्रकरणी औरंगाबाद येथील घाटी हाँस्पीटल चौकीचे पोलीस नाईक एम. डी. सोनवणे यांच्या फीर्यादीवरून गंगापुर पोलीस ठाण्यात आकस्मत मृत्यची नोंद करण्यात आली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.