ETV Bharat / state

'लॉकडाऊन मान्य करू नका, पहिल्यासारखं जीवन जगा' - लॉकडाऊन मान्य करु नका, आंबेडकर

लॉकडाऊनच्या चक्रात केंद्र आणि राज्य सरकार अडकले असून, त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे लोकांनीच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

Prakash Ambedkar  comment on lockdown in Aurangabad
'लॉकडाऊन मान्य करु नका, पहिल्यासारखं जीवन जगा'
author img

By

Published : Jul 31, 2020, 4:30 PM IST

औरंगाबाद - लॉकडाऊनच्या चक्रात केंद्र आणि राज्य सरकार अडकले असून, त्यांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे लोकांनीच त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य वंचीत बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. 130 कोटी लोकसंख्येपैकी 5 कोटी लोकांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, त्यांची प्रतिकार शक्ती वाढवणे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 15 टक्के लोकांना लक्षणे दिसू शकतात, त्यांच्यावर सामान्य औषधे देऊनही उपचार केले जाऊ शकतात. पाच टक्के लोक वाचवण्यासाठी इतर लोकांना वेठीस धरत असून, त्यांचा बळी घेतला जात आहे.

आता सण आहेत, त्यामुळे लोकांना आवाहन करतो की, त्यांनी सर्व दुकाने उघडा, पाण्याच्या टपऱ्या असतील, रिक्षा असतील, बसचालक आणि वाहकांनी स्वतः कामावर जावं, लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. लोकांना मोफत अन्न धान्य देण्याची घोषणा केली. मात्र, त्याचे काही झालं नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

पाच टक्के लोकांची व्यवस्था, तर केली पाहिजे. मात्र, अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून तिला रुळावर आणण्याचे काम सर्वसामान्य लोकांनी केलं पाहिजे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आवाहन करत आहे की, लॉकडाऊनला मान्य करू नका, पहिल्यासारखे जीवन जगायला सुरुवात करा, रक्षाबंधन आपल्या पद्धतीने साजरा करत असताना पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू करा आणि लोकांना त्यांचे सण साजरे करू द्या. लॉकडाऊनला पाठिंबा नाही हे दर्शवण्यासाठी लोकांनी जो झेंडा मनात असेल त्याने तो झेंडा आपल्या घरावर फडकवा, तिरंगा फडकवला तर उत्तम, लॉकडाऊन मान्य नाही ते सरकारला सांगा, असे आंबेडकर म्हणाले. कामगारासारखे हाल व्यावसायिकांचे होत असल्याचेही आंबेडकर म्हणाले.

मोदी धार्मिक नेता

सामान्य माणसाचे जीवन सर्वसामान्य झालं पाहिजे. कोरोना आता नियंत्रणात आला आहे. डॉक्टरांची मेहनत आहे. सरकारने हे लोकांना सांगितलं पाहिजे. मात्र, मोदी हा नेता नाही तो धार्मिक नेता असल्याचे म्हणत त्यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला. कायद्याचे उल्लंघन होत असेल तर माझ्यावर गुन्हे दाखल करा, मला ते मान्य असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.