ETV Bharat / state

'सीएए विरोधात न्यायालयात जाऊ नका; न्यायालय आपलं नाही' - dont go in court say prakash ambedkar aurangabad

सीएए आणि एनआरसी विरोधात औरंगाबादेत जवळपास 40 पक्ष-संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात वंबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, मुस्लीम धर्मगुरू यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Prakash ambedar spoke during against CAA public meeting in aurangabad
प्रकाश आंबेडकर (संस्थापक, वंबआ)
author img

By

Published : Dec 27, 2019, 8:52 PM IST

औरंगाबाद - सीएए आणि एनआरसी विरोधात न्यायालयात जाऊ नका, तुम्हाला न्याय मिळणार नाही. कारण, न्यायालय आता आपले राहिले नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी येथे केली. सीएएच्या विरोधात काढण्यात येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.

प्रकाश आंबेडकर (संस्थापक, वंबआ)

पुढे ते म्हणाले, अजित पवार मनाने मोकळा असलेला माणूस आहे. त्याला जे वाटत तो ते स्पष्ट बोलतो, त्यांची बारामतीमध्ये झालेली पत्रकार परिषद ऐका. भाजप का मोठा आहे, भाजप काय करणार आहे हे लक्षात येईल, अशी टीकाही त्यांनी केली. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात उभे राहतात. हिंदूंनादेखील सोबत घ्या. ही लढाई एकट्या मुस्लिमांची नाही, असा टोला आंबेडकर यांनी एमआयएमला टोला लगावला.

सीएए आणि एनआरसी विरोधात औरंगाबादेत जवळपास 40 पक्ष-संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात वंबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, मुस्लीम धर्मगुरू यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हा महाराष्ट्र सामाजिक एकता शिकवणाऱ्या महापुरुषांचा आहे. ही लढाई कोणत्या एका समाजाची नाही. आमच्याकडे गांधीजींच्या आदर्शाचे शस्त्र आहे. इंग्रजांना देशातून हाकलून दिले, तर हे कोण आहेत, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लावला.

हेही वाचा - राहुल गांधींनी आदिवासींबरोबर पारंपारिक नृत्यावर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

सेक्युलरवाद्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. डिटेन्शन कॅम्प सुरु करण्यात आले. जर एनआरसी लागू करण्यात येणार नसतील तर डिटेन्शन कॅम्प कशासाठी? असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. नवी मुंबई, खारघर मध्ये डिटेन्शन कॅम्प बनवले जात आहेत. याचा खुलासा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच केला होता. एनआरसी मुस्लिमांच्या आणि ४० टक्के हिंदूच्याही विरोधात आहे. ४० % हिंदूसुद्धा एनआरसीचे बळी होतील. मुंबईतील मोर्चात हिंदूंची संख्या अधिक होती. एनआरसीच्या विरोधात सर्वधर्मीय एकत्र आहेत. हिंदू सेक्युलर समाजाची ताकद लवकरच आम्ही दाखवू, मुस्लीम समाजाला आव्हान करतो त्यांनी यांना मदत करावी आणि एनआरसी व सीएएच्या विरोधात ताकद उभी करावी, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.

हेही वाचा - महाराष्ट्र एकीकरण समितीमधल्या एकाच्याही केसाला धक्का लागला तर गाठ सेनेशी - धैर्यशील माने

शहरात सीएए विरोधात निघालेला हा दुसरा मोठा मोर्चा आहे. हातात तिरंगा आणि काळा झेंडा हातात घेऊन नागरिकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. देशात कायद्याविरोधात अनेकांनी तीव्र विरोध केल्याचे दिसून येत आहे.

Intro:सीएए आणि ऐनआरसी विरोधात न्यायालयात जाऊ नका तुम्हाला न्याय मिळणार नाही, कारण न्यायालय आता आपलं राहील नसल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादेत केली. सीएएच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चात प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली.Body:अजित पवार मनाने मोकळा असलेला माणूस आहे. त्याला जे वाटत तो ते स्पष्ट बोलतो, त्यांची बारामतीमध्ये झालेली पत्रकार परिषद ऐका भाजप का मोठा आहे, भाजप काय करणार आहे हे पक्षात येईल अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या सभेत केली. सीएए आणि ऐनआरसी च्या विरोधात उभे राहतात हिंदूंना देखील सोबत घ्या ही लढाई एकट्या मुसलमानांची नाही असं वक्तव्य करत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला टोला लगावला.Conclusion:सीएए आणि ऐनआरसी विरोधात औरंगाबादेत जवळपास 40 पक्ष - संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, मुस्लिम धर्मगुरू यांच्यासह राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सेक्युलरवाद्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याच मत ॲड प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. डिंटेशन कॅम्प सुरु करण्यात आले जर एनआरसी लागु करण्यात येणार नसतील तर डिंटेशंन कॅम्प कश्यासाठी असा प्रश्न आंबेडकरांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदींना विचारला. नवी मुंबई, खारघर मध्ये डिटेशंन कॅम्प बनवले जात आहे. याचा खुलासा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच केला होता. एनआरसी मुस्लिमांच्या तसेत ४० % हिंदूच्या विरोधात सुद्धा आहे. ४० % हिंदू सुद्धा एनआरसीचे बळी होतील. मुंबईतल्या मोर्चात हिंदूंची संख्या अधिक होती. एनआरसीच्या विरोधात सर्वधर्मीय एकत्र आहेत. हिंदु सेक्युलर समाजाची ताकद लवकरच आम्ही दाखवू मुस्लिम समाजाला आव्हान करतो त्यांनी यांना मदत करावी व एनआरसी व सीएए च्या विरोधात ताकद उभी करावी अस प्रकाश आंबेडकरांनी जाहीर सभेत सांगितलं. तर हा महाराष्ट्र सामाजिक एकता शिकवणाऱ्या महापुरुषांचा आहे. ही लढाई कोणत्या एका समाजाची नाही. आमच्याकडे गांधीजींच्या आदर्शाच शस्त्र आहे. इंग्रजांना देशातून हाकलून दिल हे कोण आहेत असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लावला. तर कुठल्याही परिस्थिती देशात कायदा लागू झाला नाही पाहिजे आपला विरोध कायम राहील अशी भूमिका उपस्थित नेत्यांनी जाहीर केली. औरंगाबादेत सीएए विरोधात निघालेला हा दुसरा मोठा मोर्चा आहे. हातात तिरंगा आणि काळा झेंडा हातात घेऊन नागरिकांनी सरकार विरोधी घोषणाबाजी केली. देशात कायद्याविरोधात अनेकांनी तीव्र विरोध केल्याचं दिसून येत आहे.
Byte - प्रकाश आंबेडकर - प्रमुख वंचित आघाडी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.