औरंगाबाद - कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आंदोलन करताना पोलिसांनी ताब्यात घेतले. रस्तारोको आंदोलन करताना वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांच्या सूचनेनंतरही आंदोलन मागे न घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना समज देऊन सोडण्यात आले.
कन्नड तालुक्यातील हतनूर येथे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय महामार्गावर उड्डाण पुलाची ऊंची वाढविणे, चिखलठाण व चापानेर मंडळांतर्गत वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी रस्तारोको आंदोलन करण्यात आले आहे.
दोन तास हे रास्तारोको आंदोलन सुरु होते. कृषी व महसूल तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी तसेच तोंडी आश्वासन दिले. यावेळी हर्षवर्धन जाधव यांच्यासह आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. जो पर्यंत संबधित विभागाकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत मी उठणार नाही, अशी भूमिका आमदार जाधव यांनी घेतली होती. दोन तासापेक्षा अधिक वेळ हे आंदोलन सुरु होते. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजुला तीन ते चार किलोमीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांसह माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना ताब्यात घेत समज देऊन सोडून दिले.