ETV Bharat / state

Aurangabad Crime : औषधी दुकानासमोरून पोलिसानेच उचलली दुचाकी; पहा CCTV फुटेज - CCTV Footage

औरंगपुरा भागातील एका दुकानासमोर लावलेली दुचाकी घेऊन जाणारी व्यक्ती चक्क पोलिसच असून सीसीटीव्हीत सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेज समाजमाध्यमांवर व्हायरल झाले. एकंदरीत पोलिसांच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जात आहे.

Aurangabad Crime
वाहन चोरी
author img

By

Published : Jul 28, 2023, 5:40 PM IST

औरंगाबाद : ताब्यात घेतलेल्या वाहनाची नोंद न करणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. गुरुवारी मध्यरात्री औरंगपुरा भागातून पोलिसांनी एक दुचाकी ताब्यात घेतली. वाहनचालक सकाळी आल्यावर गाडी चोरीला गेल्याचा संशय त्याला आला. सीसीटीव्ही तपासला तेव्हा पोलिसांनीच वाहन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र त्याबाबत सिटीचौक पोलिसात नोंद नसल्याने या प्रकरणाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. अखेर पोलीस आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर अहवाल प्राप्त झाल्यावर अधिक माहिती देण्यात येईल अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अशी घडली घटना : आशा ट्रेडर्स या औषधी दुकानात काम करत असलेल्या युवकाने, आपली गाडी बाहेर लावली होती. रात्री जाताना त्याने गाडी तिथेच ठेवली आणि मालकाची गाडी घेऊन घरी गेला. सकाळी आल्यावर त्याची गाडी जागेवर नसल्याने त्याने शोधाशोध केली. त्याने त्याठिकाणी लावलेले सीसीटिव्ही तपासले. रात्री अडीचच्या सुमारास पेट्रोलिंग गाडीमधून आलेल्या पोलिसांनी दुचाकी नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी सिटीचौक पोलिसात विचारणा केली करण्यात आली. परंतु कुठलीही नोंद आढळून आली नाही. मात्र पोलीस स्टेशन आवारात दुचाकी उभी असल्याचे समोर आले. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना देखील माहिती नसल्याने पोलिसांनीच वाहन चोरल्याची चर्चा रंगली आहे.

यामुळे वाढला संशय : पोलिसांनी याबाबत माहिती देताना काही खुलासा केला आहे. त्यांच्यानुसार गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास एका नशेखोराला त्या वाहनाच्या जागेवर पोलिसांनी पाहिले. त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्यानंतर ते त्या ठिकाणी नेमके काय करत होते याचा तपास घेण्यासाठी पोलीस त्याठिकाणी पुन्हा आले. सदरील वाहन त्याने चोरून तर आणले नाही ना, असा संशय त्यांना आल्याने त्यांनी तातडीने ते ताब्यात घेतले अशी माहिती, पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र सीसीटीव्ही तपासले असता पोलीस त्या ठिकाणची सगळी वाहने तपासत असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर ही दुचाकी ताब्यात घेतली. त्यामुळे संशय पोलिसांवर असल्याचे बोलले जात आहे. सदरील प्रकरणात पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांना विचारणा केली. त्यावेळी त्यांनी सांगितले की, पोलीस आयुक्तांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा -

  1. Chhatrapati Sambhajinagar Crime News: चोरट्यांनी भरदिवसा पळवली व्यापाऱ्याची बॅग, घटना सीसीटिव्हीमध्ये कैद
  2. Nashik Crime : बस स्थानकातून तरुणाचे अपहरण करुन मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद
  3. Cloth Theft Incident Mumbai: उच्चभ्रू ग्राहक बनून आल्या अन् 7.5 लाखांचे कपडे चोरून झाल्या फुर्रर्र..; महिला चोरांचा प्रताप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.