औरंगाबाद - तरुणीचे अपहरण केल्याप्रकरणी ५ आरोपींविरुद्ध अपहरणासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पैठण पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पैठण तालुक्यातील मायगाव येथील साडेसतरा वर्षीय तरुणीचा शिक्षणासाठी काही औरंगाबाद येथे वास्तव्यास होती.या कालावधीत तीचे औरंगाबाद तेथील एका युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ती आपल्या मूळ गावी पैठण तालुक्यातील मायगावला आई-वडिलांकडे आली होती. १९ मे रोजी मुलीच्या वडिलांनी तिचा साखरपुडा आपल्या नात्यातील पुणे जिल्ह्यातील तर्डे कुटुंबातील युवकासोबत केला. १ जूनला तिचे आई वडील औरंगाबाद येथे कामानिमित्त गेले होते. दुपारी पावणे एक वाजता ते घरी परतले असता मुलगी घरी नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गावात चौकशी केली असता मुलीला मोटारसायकल वरून आलेल्या काहींनी पळवून नेले असल्याचे वडिलांना समजले.
तरूणीच्या वडिलांनी विना नंबरच्या तीन मोटारसायकलवरून आलेल्या आशिष जाधव (न्यायनगर,) राहुल चाबुकस्वार (हुसेन काॅलनी), तुषार राठोड (न्यायनगर,) सुरेश रजने (हनुमाननगर), सुधीर भार साखळे (न्यायनगर) यांनी संगनमत करून आणि बळजबरीने आपल्या मुलीला पळवून नेले असल्याची तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दिली. तरुणीच्या अंगावर राणी हार, गंठण, झुंबर, रिंगा, अंगठ्या असे जवळपास १८ तोळे दागदागिने होते, असे तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन सानप करत आहेत.