औरंगाबाद - आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणारा तसेच सामन्यावर सट्टा लावणारा अशा चौघांना जिन्सी पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून मोबाईलसह २४ हजार रोकड जप्त करण्यात आली आहे. गणेश कचरू व्यवहारे ( वय ३५, रा. ग. नं ५, हनुमान नगर), मनोज दगडा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
जुना मोंढा भागात व्हाट्सअॅपच्याद्वारे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती जिन्सी ठाण्याचे उपनिरीक्षक दत्ता शेळके यांना मिळाली. माहितीची शहानिशा करून त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळवली. त्यानंतर जुना मोंढा भागात छापा टाकत गणेश व्यवहारेला ताब्यात घेतले. त्यानंतर सट्टा लावण्यासाठी भाव कोण पाठवतो, याची विचारणा केली, सुरुवातीला त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने व्हाट्सअॅपच्याद्वारे मनोज दगडा भाव पाठवत असल्याचे सांगितले.
त्यावरून मनोज दगडा यालाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून जप्त केलेल्या मोबाईलमधून निसार आणि खान हे त्याच्याकडे सट्टा लावत असल्याचे निष्पन्न होताच, त्यांनाही अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून दोन मोबाईल, २४ हजार रोकड जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - एमपीएससीची परीक्षा होऊ देणार नाही, मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा
हेही वाचा - जागतिक टपाल दिनानिमित्त औरंगाबादेत लहान मुलांसाठी पत्रलेखनाचा उपक्रम