औरंगाबाद - बहिणीला पळवून नेऊन प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावोजीचा खून ( Brother In Law Murder At Aurangabad ) केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी इसारवाडीत घडली होती. बापू खिल्लारे (वय 30 वर्षे) असे मृत भावोजीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या ( Police Arrested Brother In Law Murder Accused ) तीन तासातच मुसक्या आवळल्या आहेत. खून केल्यानंतर मारेकऱ्याने औरंगाबाद नगर ( Police Arrested Murder Accused At Aurangabad ) रोडवर शर्ट काढून जल्लोष केला (Aurangabad Crime News) होता.
अशा आवळल्या पोलिसांनी फरार आरोपीच्या मुसक्या औरंगाबाद नगर महामार्गावर इसरवाडी फाटा महामार्गावरच आरोपीने कुऱ्हाडीने वार ( Brother In Law Murder At Aurangabad ) करून भावोजीचा खून केला होता. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त अशोक थोरात, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, उपनिरीक्षक लक्ष्मण उंबरे, आदी पोलीस अदिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणातील आरोपी खून ( Police Arrested Brother In Law Murder Accused ) करून घटनास्थळावरून पसार झाला. वाळूज पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवत तीन तासात आरोपीच्या नगर जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या आहेत.
औरंगाबाद नगर महामार्गावर काही काळ वाहतुकीचा खोळंबा औरंगाबाद नगर महामार्गावर इसारवाडी फाटा येथे महामार्गावरच बापू खिल्लारे यांचा खून करण्यात आला. त्यांच्या मृतदेह रोडवरच पडून असल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. झालेल्या खून प्रकरणामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आरोपीने महामार्गावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर विकृतपणे जल्लोष केल्याने खळबळ उडाली.