ETV Bharat / state

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्ती घरातूनच अभिवादन करण्याचे पोलिसांचे आवाहन - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनी घरूनच अभिवादन करण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

University Name Extension Day
University Name Extension Day
author img

By

Published : Jan 11, 2021, 8:58 PM IST

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त पक्ष, संघटना, कार्यकर्त्यांनी कोरोना आजाराच्या परश्र्वभूमीवर प्रत्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात न येता राहत्या घरातूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त मीना मकवाना यांनी केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त मराठवाड्यातील कानाकोपऱ्यातून आंबेडकर अनुयायी नामांतर लढ्यात शहीद झालेल्यांना अभिवादन करण्यासाठी येतात. मात्र कोरोना आजाराची परिस्थिती लक्षात घेता अनुयायांनी विद्यापीठात येऊन अभिवादन न करता घरूनच अभिवादन करावे, असे आवाहन पोलीस उप आयुक्त मीना मकवाना यांनी केले. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

मराठवाड्यातून येतात अनुयायी -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ गेट अनुयायांसाठी अत्यंत श्रध्देचे स्थान आहे.यामुळे विद्यापीठ गेट परिसरात सकाळ पासुन अनुयायांची रिघ लागलेली असते. यासाठी मराठवाडयातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, तसेच पुणे, अहमदनगर, बुलढाणा आणि औरंगाबाद ग्रामिण भागातुन आंबेडकर संघटनांचे कार्यकर्ते सहभाग घेतात. विद्यापीठ गेटसह अनेक ठिकाणी मिठाई, साखर, अन्नदान करुन आनंद व्यक्त केला जातो तसेच अनेक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

तगडा पोलीस बंदोबस्त -

राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये अद्यापही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळुन येत आहेत. यामुळे गर्दी करू नये. १४ जानेवारी रोजी शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आदेशाचे उल्लघंन केल्यास त्यांचे विरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. कोणत्याही प्रकारचे रैली, जाहीर सभा, धार्मीक कार्यक्रम राजकीय कार्यक्रम यांना परवानगी देण्यात आलेले नाही.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.