ETV Bharat / state

घरात घुसून 30 वर्षीय महिलेवर अत्याचार - घरात घुसून महिलेवर बलात्कार

वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे एका 30 वर्षीय महिलेवर तिच्या घरात घुसून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पवन महेर असे गुन्हा दाखल झालेल्या नराधमाचे नाव आहे. महिलेने उसने दिलेले पैसे मागितले. मात्र, पैसे परत न करता आरोपीने हे क्रूर कृत्य केले.

Aurangabad
Aurangabad
author img

By

Published : Jun 16, 2021, 10:00 PM IST

औरंगाबाद - वैजापूर तालुक्यातील पालखेड येथे एका 30 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिच्यावर नराधमाने बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन महेर (रा. पळशी, ता. सिल्लोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

भावाकडे आल्याने झाली महिलेशी ओळख

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील पीडित महिला ही पालखेड येथील रहिवासी आहे. ती सध्या औरंगाबाद येथे पती व मुलांसोबत राहते. ती सुमारे चार महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील म्हाडा कॉलनी परिसरात तिच्या नातेवाईकांकडे गेली होती. त्यावेळी पवन महेर हा त्याचा भाऊ जीवन महेर याच्या घरी आला होता. यावेळी तेथे त्याची पीडित महिलेशी ओळख झाली होती. सुमारे महिनाभरानंतर पवन याचा भाऊ जीवन व मामाच्या मध्यस्थीने महिलेने पवन याला एका महिन्याच्या वायद्यावर 45 हजार रुपये हात उसने म्हणून दिले होते. महिनाभरानंतर महिलेने पवनकडे पैशांसाठी तगादा लावला. मात्र, पवनने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संबंधित महिलेने पवन, त्याचा भाऊ व मामा यांच्याविरुद्ध एमआयडीसी वाळुज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसला अन्...

त्यानंतर तो 7 जून रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पीडिता घरी एकटी असताना पवन तिच्या पालखेड येथील घरी गेला. 'मी पुढे शिर्डीला जात आहे. मला प्यायला पाणी द्या', असे म्हणाला. महिला पाणी आणण्यासाठी घरात गेली. यावेळी पवनने तिच्या घरात घुसून दरवाजा आतून लावून घेतला. यावेळी त्याने तिचा गळा दाबून जीवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंधाची मागणी केली. यानंतर त्याने महिलेवर जबरदस्तीने बलात्कार केला. शिवाय जाताना 'तुला तुझे पैसे देणार नाही व कुणाला काही सांगितले तर जीवे मारून टाकीन' अशी धमकी दिली. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापती करत आहेत.

हेही वाचा - सिनेमा आणि जाहिरातीमध्ये काम देतो असे सांगून फसवणाऱ्या भामट्याला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.