ETV Bharat / state

पैठणमध्ये साथीच्या आजारांचे थैमान, २ दिवसांत १७० रुग्ण दाखल - साथीचे आजार

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र, डेंग्यू, मलेरिया, टायफाईड सारख्या आजांरावर अद्यापही ग्रामीण भागात नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. बिडकीन पंचक्रोशीतील जवळपास 170 रुग्णांनी गेल्या २ दिवसांत उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालय गाठले.

पैठणमध्ये साथीच्या आजारांचे थैमान
author img

By

Published : Oct 12, 2019, 4:49 PM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात साथीच्या आजारांनी थैमान घातले. त्यामुळे परिसरातील जवळपास ४० गावातील ग्रामस्थ बिडकीन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहेत. सर्वजण टायफाईड, मलेरिया, सर्दी, खोकला, वांत्या-जुलाब, अंग दुखणे, अशक्तपणा, अशा अनेक आजारांनी त्रस्त असल्याचे दिसून आले.

पैठणमध्ये साथीच्या आजारांचे थैमान, २ दिवसात १७० रुग्ण दाखल

हे वाचलं का? - पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या रोगांपासून 'असा' करा बचाव - डॉ अविनाश भोंडवे

ग्रामीण भागात स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही साथ उद्भवली असल्याचे बिडकीन ग्रामीण वैद्यकीय अधिकारी अंजली देशपांडे यांनी सांगितले. शौचानंतर हात न धुणे, उघड्यावरचे खाणे, आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ न ठेवणे, पावसामुळे साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न करणे यासारख्या कारणांमुळे ही साथ पसरली असल्याची शंका देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे हे साथीचे प्रमाण वाढले असल्याचेही त्या म्हणाल्या.

हे वाचलं का? - पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून बचावासाठी करा 'हे' उपाय

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सरकार करोडो रुपये खर्च करत असते. मात्र, डेंग्यू, मलेरिया, टायफाईड सारख्या आजारावर अद्यापही ग्रामीण भागात नियंत्रण मिळवण्यात यश आले नाही. बिडकीन पंचक्रोशीतील जवळपास 170 रुग्णांनी गेल्या २ दिवसात उपचारासाठी बिडकीन ग्रामीण रुग्णालय गाठले. रुग्ण अंगदुखी, सर्दी, खोकला अशी तक्रार करत असेल, तर डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, रुग्णांची रक्त तपासणी आणि लघवी तपासणीचा अहवाल आल्याशिवाय आजाराचे निदान लावणे शक्य होत नसल्याचे देशपांडे म्हणाल्या.

Intro:पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले असून ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आलीBody:पैठण तालुक्यातील बिडकीन परिसरात सातीच्या आजाराने थैमान घातले असून पंचक्रोशीतील जवळपास चाळीस गावचे ग्रामस्थ बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे । हे रुग्ण टायफाईड, मलेरिया, सर्दी, खोकला, वांत्या-जुलाब, अंग दुखणे, अशक्तपणा येणे अशा प्रकारच्या आजाराने ग्रस्त आहे ।Conclusion:यंदा संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घेतलं आहे।
ग्रामीण भागात स्वच्छते कडे दुर्लक्ष केल्याने ही सात उद्भवली असल्याचे बिडकीन ग्रामीण वैद्यकीय अधिकारी अंजली देशपांडे यांनी सांगितले, शौचानंतर हात न धुणे, उघड्यावरचे खाणे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ न ठेवणे ,.पावसामुळे साचलेल्या पाण्याचा व्यवस्थित निचरा न करणे, त्या मुख्य कारणाने ही सात पसरली असल्याची शंका आहे ।
पाण्यात डेंगू प्रजाती च्या डासांची उत्पत्ती होते, त्यामुळे हे साथीचे प्रमाण वाढले आहे।
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सरकार करोडो रुपये खर्च करत असते मात्र डेंगू, मलेरिया, टायफड, सारख्या आजारावर अध्याप ग्रामीण भागात नियंत्रण मिळवलेलं नाही असे दिसून येते। बिडकीन पंचक्रोशीतील जवळपास 170 रुग्णांनी गेल्या दोन दिवसात उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बिडकीन गाठले ।
रुग्ण अंगदुखी, सर्दी, खोकला, अशी तक्रार करत असेल तर डेंगू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र रुग्णांचा रक्त तपासणी आणि लघवी तपासणीचा अहवाल आल्याशिवाय खुलासा करू शकणार नसल्याची खंत त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले ।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.