औरंगाबाद - पैठणच्या बिडकीन परिसरात झालेल्या दरोडा व बलात्कार प्रकरणी आरोपीच्या शोधासाठी तैनात पथकाने आठ संशयित आरोपीची ओळख पटवली असून एका आरोपीला काल रात्री उशिरा ताब्यात घेतल्याचे माहिती आहे. प्रभू पवार (रा. दुधाळ औरंगाबाद) असे या आठ पैकी एका संशयित आरोपीचे नाव आहे.उर्वरित आरोपींचाही कसून शोध सुरू आहे.
बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मदतीस घेतले आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक केएम प्रसन्ना यांच्या आदेशानुसार 11 टिम तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या आदेशावरून बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मदतीस घेतले आहे. पुण्यातील तपासाची माहिती आम्ही न्यायालयात सादर करू, असे ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांनी सांगितले.
पैठण तालुक्यातील बिडकीन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तोंडोळी गावालगतच्या शेतवस्थीवर मंगळवारी रोजी मध्यरात्री सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत शेती वस्तीवर राहणाऱ्या परप्रांतीय कुटुंबातील एका महिलांवर चाकु व कुर्हाडीचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली होती.
पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तोंडोळी येथे मंगळवारी रोजी मध्यरात्री सात दरोडेखोरांनी धुमाकूळ घालून शेती वस्तीवर राहणाऱ्या एका परप्रांतीय महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती.
तोंडोळी गावालगत औरंगाबाद येथील मगरे यांची शेती वस्ती आहे. या ठिकाणी राजू टेमा बारेला (रा. बलोली जि. मध्यप्रदेश) यांच्या सह तीन परप्रांतीय परिवार मजूर शेतीकामासाठी ठेवण्यात आले आहे. नेहमीप्रमाणे हे कुटुंब शेती वस्तीवर झोपेल असताना सहा ते सात दरोडेखोरांनी हातामध्ये प्राणघातक शस्त्रांसह धुमाकूळ घातला. मंगळवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास 7 ते 8 दरोडेखोरांनी तोंडुळी येथील शेतवस्तीवर हल्ला चढविला. सुरवातीला वस्तीवर असलेल्या पुरुषांना चाकू आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवत लूटमार करण्यात आली. त्यांना बांधून ठेवत घरातील 23 वर्षीय आणि दुसऱ्या 30 वर्षीय महिलेवर चार दरोडाखोरांनी सामूहिक बलात्कार केला.
दरोडेखोरांची पुरुषांना बेदम मारहाण -
दरोडेखोरांनी घरातील पुरुषांना उलट्या कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण करून आधी त्यांना घराबाहेर काढले. घरातील महिलांवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे यातील एका पीडित महिलेला पाच ते आठ महिन्यांचे लहान बाळ आहे. दरोडेखोरांनी क्रूरतेचा कळस गाठला. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
हेही वाचा - बिडकीन अत्याचार घटनेनंतर राजकीय वातावरण तापले, चित्रा वाघांनी दिली घटनास्थळी भेट