औरंगाबाद - येथील एमआयएमच्या प्रचारसभेत खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी प्रज्ञा सिंह ठाकुर यांच्या उमेदवारीवरून नरेंद्र मोदींवर टीका केली. नरेंद्र मोदींनी साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामध्ये असे काय पाहिले, असा प्रश्न भर सभेत उपस्थित करत कही टाका तो नही है, असे विवादित वक्तव्य केले.
वंचित बहुजन आघाडीकडून औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात नशिब आजमावणारे पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी ओवैसी दोन दिवसांपासून शहरात तळ ठोकून आहेत. आज शहरातील किराडपुरा भागांमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा होती. या सभेमध्ये त्यांनी मोदींना लक्ष्य केले. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपाने उमेदवारी दिल्याने ओवैसी चांगलेच संतापले. त्यांच्या भाषणात त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंगला उमेदवारी कशी, तिच्यावर असलेले आरोप गंभीर नाहीत का? एखाद्यावर दहशतवाद माजवण्याचा गुन्हा दाखल असताना त्याला उमेदवारी देणे कितपत योग्य आहे. एखाद दुसऱ्यावर दहशतवाद माजवण्याचा गुन्हा दाखल असता तर त्याने निवडणूक लढविली असती किंवा मी दहशतवादाचा आरोप असलेल्या व्यक्तीबरोबर फोटो जरी काढला असता तर त्यांनी फिरून फिरून दाखवले असते. अशी टीका नरेंद्र मोदींवर केली. प्रज्ञा सिंह ठाकुर मध्ये मोदींनी असे काय पाहिले जे त्यांना उमेदवारी दिली असे म्हणत कही टाका तो नही है, असे वक्तव्य केल्याने पुन्हा नवीन वाद उठण्याची चिन्हे आहेत.