गंगापूर - औरंगाबाद - पुणे महामार्गावर गणेशवाडी जवळ असलेल्या गांधी पेट्रोल पंपासमोर रविवारी सायंकाळी सात वाजता औरंगाबाद वरून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कारने लुनाला जोरदार धडक दिल्याने भीमराज गोपाळ भरपुरे यांचा मृत्यू झाला आहे.
![दुचाकीची अवस्था](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-aur-1-axcident-mhc10083_29032021115057_2903f_1616998857_221.jpg)
हेही वाचा - होळकर विद्यापीठाची स्मार्ट विद्यापीठाकडे वाटचाल; १ कोटी २० लाख रुपये खर्चून उभारला अत्याधुनिक स्टुडिओ
औरंगाबाद पुणे महामार्गावर गणेशवाडीजवळ गांधी पेट्रोल पंपावर सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एसबीआय बँकेचे निवृत्त कर्मचारी भीमराज गोपाळ भरपुरे पेट्रोल भरण्यासाठी जात असताना औरंगाबाद वरून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव कार क्रमांक mh 19 cf 5999 ने लुनाला जोरदार धडक दिली. लुनावरील भरपुरे हे गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले असता डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशन येथे कारचालकवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - गांजाची विक्री करताना महिलेला अटक; घरातून गांजा, चरससह 6.5 लाखाचा मुद्देमाल जप्त