औरंगाबाद- जिल्ह्यात बुधवारी सकाळी 114 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2264 वर पोहोचली आहे. यापैकी 1283 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून 116 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 865 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
सकाळी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये कैलास नगर (2), कटकट गेट (1), संसार नगर (1), बारी कॉलनी (2),उत्तम नगर त्रिमूर्ती नगर जवळ (1), औरंगपुरा (1),सिडको एन सात (2),अरिहंत नगर (1), न्याय नगर, गारखेडा (1), संजय नगर, बायजीपुरा (1), शांतीनिकेतन कॉलनी (1), गजानन नगर, गारखेडा (1), भानुदास नगर (1), गारखेडा परिसर (5), सारंग सोसायटी (2), सहयोग नगर (2),सिटी चौक (1), खोकडपुरा (1), फाहेत नगर, राहत कॉर्नर (3), हर्ष नगर (2), बाबर कॉलनी (1), टिळक नगर (2), शहा बाजार (1), पडेगाव (3), शिवाजी नगर (1), बेगमपुरा (2), बजाज नगर,सिडको (1), जुना बाजार (1), मुलमची बाजार,सिटी चौक (2), मयूर नगर, एन अकरा (3), एन आठ (2), आकाशवाणी परिसर (1), मसोबा नगर (1), एन अकरा (1), एन चार,सिडको (1), विशाल नगर (1), आदिनाथ नगर, गारखेडा (2), जाधववाडी (1), टी. व्ही. सेंटर (1), आरटीओ ऑफिस परिसर (1),चित्रेश्वर नगर (1), बीड बायपास (1), पुष्पक गार्डन, चिकलठाणा (2), रोकडिया हनुमान परिसर (1), मस्के पेट्रोलपंपाजवळ (1), प्रताप नगर,सिडको (1), एन सहा, साई नगर,सिडको (1), बंजारा कॉलनी (1), मुकुंदवाडी गाव, ता. फुलंब्री (1), ज्योती नगर, दर्गा रोड (1), इंदिरा नगर, बायजीपुरा (1), सावरखेडा, ता. सोयगाव (2), कन्नड (1), सिता नगर, बजाज नगर (5), बजाज नगर परिसर (11), सिडको वाळूज महानगर एक (2), मोहटादेवी मंदिराजवळ, बजाज नगर (1), वडगाव कोल्हाटी (1), गणेश नगर, पंढरपूर (2), अन्य (16) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 39 महिला आणि 75 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
मंगळवारी मृतांची संख्या आठ ने वाढली आहे. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 116 झाली आहे. जून महिन्यात मृतांची संख्या 40 झाली आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये मृतांची रोजची संख्या चार पेक्षा अधिक आहे. त्यामुळे औरंगाबादकरांची चिंता वाढली आहे. मंगळवारी घाटीत सहा, तर खासगी रुग्णालयात दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
घाटी रुग्णालयातील औरंगाबाद शहरातील आरिफ कॉलनीतील 55 वर्षीय पुरूष रुग्ण,क्रांती चौकातील रमा नगरातील 83 वर्षीय पुरूष , जाधववाडीतील 40 वर्षीय स्त्री रुग्ण, युनुस कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष ,जहागीरदार कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष आणि जिन्सी परिसरातील 80 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष या रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
रोशन गेट येथील मुजीब कॉलनीतील 67 वर्षीय पुरूष आणि गारखेडा परिसरातील 73 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आतापर्यंत घाटीत 88, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये 27, जिल्हा रुग्णालयात 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 116 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.