औरंगाबाद - कन्नड तालुक्यातील नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी येथील वेळगंगा नदीच्या पुलावर बस व मोटारसायकलमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर, एक गंभीर जख्मी झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, राहुरीहुन कन्नडकडे जाणारी बस (क्रमांक महा०७.सी.७२२५)ही देवगाव रंगारीजवळ वेळगंगा नदीवरील निजामकालीन पुलावरून जात होती. यावेळी समोरून येणारी डिस्कव्हर मोटारसायकलमध्ये जबरदस्त अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरण विष्णु जीते (वय २३ रा.देवगाव रंगारी ता.कन्नड) हा बसखाली आल्याने तो जागीच ठार झाला.अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीसह किरण जीते जवळपास तीस फुटांपर्यंत फरफटत गेला. या अपघातात त्याच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.
अपघातात पुलावरून पायी जाणारे परप्रांतीय मजूर अशोक कलमे यांना जोराचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झालेत्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले - कन्नड तालुक्यातील नाशिक महामार्गावरील देवगाव रंगारी येथील वेळगंगा नदीच्या पुलावर बस व मोटारसायकलमध्ये अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला. तर, एक गंभीर जख्मी झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, राहुरीहुन कन्नडकडे जाणारी बस (क्रमांक महा०७.सी.७२२५)ही देवगाव रंगारीजवळ वेळगंगा नदीवरील निजामकालीन पुलावरून जात होती. यावेळी समोरून येणारी डिस्कव्हर मोटारसायकलमध्ये जबरदस्त अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार किरण विष्णु जीते (वय २३ रा.देवगाव रंगारी ता.कन्नड) हा बसखाली आल्याने तो जागीच ठार झाला.अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीसह किरण जीते जवळपास तीस फुटांपर्यंत फरफटत गेला. या अपघातात त्याच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाला.
अपघातात पुलावरून पायी जाणारे परप्रांतीय मजूर अशोक कलमे यांना जोराचा मार लागल्याने ते गंभीर जखमी झालेत्यांना पुढील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले