औरंगाबाद - सरकार मॅनेजमेंट करण्यापेक्षा एकमेकांना मॅनेज करण्यात व्यस्त आहेत. सरकारकडून विकास कामांबाबत योग्य आढावा घेतला जात नाही. सरकार पाडण्यासाठी आमचा मानस नाही. संजय राऊत यांचे आरोप निरर्थक असून केंद्रीय यंत्रणांचा वापर चुकीच्या पद्धतीने नाही. ( Sanjay Raut Allegations on ED is Wrong) मोदी सरकारला अशा छोट्या चौकशा करण्याची गरज नाही, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athawale on ED CBI ) यांनी व्यक्त केले आहे. ते औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. ( Ramdas Athawale PC Aurangabad )
एकमेकांवर आरोप थांबवावे -
व्यवसाय करावा मात्र ते करत असताना सरकारला वेळेवर कर भरावा, अन्यथा कारवाई होते. सेना-भाजपमध्ये होणारे भांडण मिटले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा तसेच संजय राऊत यांना समज द्यावी. शिवसेना भाजप एकत्र आले पाहिजे. यासाठी आपणही प्रयत्न करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. दोन्ही काँग्रेस सोबत राहिल्यास शिवसेनेचे नुकसान होईल. जुन्या फार्मुल्यावर एक असल्यास भाजपदेखील तयार होईल. दोघांनीही ठोस पुरावे नसताना आरोप करू नये. राणे यांच्या घरावर कारवाई करणारे अधिकारी इतके वर्ष झोपले होते का? सूडाची भूमिका असू नये. कंगना रणौत यांचे कार्यालयदेखील तोडण्यात आले होते. शिवसेनेकडून आरोप होत आहेत. त्याला भाजप उत्तर देत आहेत, असेही मंत्री आठवले यावेळी म्हणाले.
हेही वाचा - Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात महिला आयोगाने दिला पोलिसांना 'हा' आदेश
दलित ऐक्यासाठी एकत्र येण्याची गरज -
दलित ऐक्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी पुढे आले पाहिजे. दलित पँथरची स्थापना नव्याने करण्याची गरज आहे. सत्तेत येणाची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र, तशी ताकद निर्माण झाली पाहिजे. विखूरलेला समाज एकवटण्याची गरज आहे, असेही ते यावेळी म्हणाले. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. मते खाण्याच्या राजकारणात समाजाचे भले होणार नाही. जिंकून येणे गरजेचे आहे. प्रकाश आंबेडकर यांना शुभेच्छा आहेत. मात्र, जागा निवडून आणल्या नाही. बाबासाहेबांनी सुरू केलेला रिपब्लिकन पक्ष व्यापक करण्याची गरज आहे. एकच लक्ष रिपब्लिकन पक्ष, असा नारा दिला पाहिजे, अशी भूमिका मी अनेकवेळा जाहीर केली. याबाबत मी प्रकाश आंबेडकर यांची भेट मागितली तरी ते देणार नाही. ते जाहीर सांगतात की त्यांना मान्य नाही. प्रकाश आंबेडकर आल्याशिवाय ऐक्य शक्य नाही, असेही ते यावेळी म्हणाले.