औरंगाबाद - जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी 91 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3207 झाली आहे. 1753 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 170 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या 1284 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
शुक्रवारी सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात राजन नगर (1), बायजीपुरा (1), रहीम नगर (1), युनुस कॉलनी (1), हनुमान चौक चिकलठाणा (1), राम नगर (1), बजाज नगर (2), रशीदपुरा (1), नारळीबाग (2), क्रांती नगर (1), अंबिका नगर (1), पुंडलिक नगर (3), नागेश्वरवाडी (2), नक्षत्रवाडी (1), हर्सुल (2), एन नऊ सिडको (2), एन अकरा सिडको (2), मिल कॉर्नर (1),एन पाच सिडको (1), एन आठ सिडको (1), शिवाजी नगर (1), जाधववाडी (2), शंभू नगर (4), चिकलठाणा (5), रामकृष्ण नगर (2), इटखेडा (2), विश्वभारती कॉलनी (2), बीड बायपास (1), न्यू हनुमान नगर (2), जय हिंद नगर, पिसादेवी (1), भानुदास नगर (1), श्रीविहार कॉलनी, बीड बायपास (3), जाधववाडी (1), पळशी (1), आरीश कॉलनी (1), गौतम नगर, प्रगती कॉलनी (1), द्वारका नगर, हडको (1), समता नगर (1), शिवाजी नगर (2), लहू नगर (2), राम नगर (1), ब्रिजवाडी (1), शहानूरवाडी (4), मुजीब कॉलनी (5), रामेश्वर नगर (2), न्यू विशाल नगर (1), मयूर नगर (1), बुढीलेन (1), सह्याद्री हाऊसिंग सोसायटी (1), सिडको महानगर (1), लोकमान्य चौक, बजाज नगर (2), सुयोग हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (4), साऊथ सिटी, सिडको महानगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), शिवालय चौक, बजाज नगर (1), सारा गौरव, बजाज नगर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 35 स्त्री व 56 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.
घाटी रुग्णालयात सिडकोतील आंबेडकर नगरातील 33 वर्षीय स्त्री, समता नगरातील 55 वर्षीय स्त्री, बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील 57 वर्षीय स्त्री, कैसर कॉलनीतील 59 वर्षीय पुरुष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत 126 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यापैकी 124 कोरोनाबाधित रुग्ण औरंगाबाद जिल्ह्यातील होते.
शहरातील खासगी रुग्णालयामध्ये गणेश कॉलनीतील 81 वर्षीय स्त्री रुग्णाचा, तर रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथील 56 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत औरंगाबाद जिल्ह्यातील 124, औरंगाबाद शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 45, जिल्हा रुग्णालयात 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 170 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.