औरंगाबाद - जिल्ह्यात सोमवारी सकाळी 102 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजरा 632 झाली आहे. यापैकी 1 हजार 968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 191 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 1 हजार 473 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले.
सोमवारी सकाळी प्राप्त अहवाल - बारी कॉलनी (1), वाळूज (3), गजानन नगर (3), गजगाव, गंगापूर (1), न्याय नगर, गारखेडा परिसर (1), मयूर नगर (3), सुरेवाडी (1), शिवाजी कॉलनी, मुकुंदवाडी (2), भाग्य नगर (5), एन अकरा, सिडको (2), सारा वैभव, जटवाडा रोड (2), जाधववाडी (2), मिटमिटा (3), गारखेडा परिसर (3), एन सहा, संभाजी पार्क (1), उस्मानपुरा (1), बजाज नगर, वाळूज (2), आंबेडकर नगर, एन सात (1), भारत नगर, एन बारा, हडको (1), उल्का नगरी, गारखेडा (1), नॅशनल कॉलनी (1), नागेश्वरवाडी (2), संभाजी कॉलनी (1), आनंद नगर (1), आयोध्या नगर, सिडको (1), शिवाजी कॉलनी, मुकुंवाडी (3), संत ज्ञानेश्वर नगर (1), राजे संभाजी कॉलनी (4), मुकुंदवाडी (1), न्यू पहाडसिंगपुरा, जगदीश नगर (1), काल्डा कॉर्नर (1), एन सहा, मथुरा नगर (1), नवजीवन कॉलनी, हडको, एन अकरा (4), एन अकरा (2), टीव्ही सेंटर (4), सुदर्शन नगर (1), दीपचैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (5), जय भवानी चौक, बजाज नगर (2), महादेव मंदिर परिसर, बजाज नगर (1), शिवशंभो हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), सारा वृंदावन हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), स्वेदशिप हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (3), फुले नगरी, पंढरपूर (3), पंचमुखी महादेव मंदिराजवळ (1), करमाड (3), मांडकी (2), पळशी (4), शिवाजी नगर, गंगापूर (4), भवानी नगर, गंगापूर (1) या भागातील कोरोना बाधित आज सकाळी समोर आले आहेत. यामध्ये यामध्ये 49 स्त्री व 53 पुरुष आहेत.
रविवारी 170 नवे रुग्ण आढळून आले. तर सोमवारी सकाळी 102 नव्या रुग्णांची भर पडली आहे. घाटी रुग्णालयात मुकुंवाडीतील संजय नगर येथील 71 वर्षीय पुरूष रुग्णाचा, बायजीपुऱ्यातील इंदिरा नगरातील 66 वर्षीय पुरुष आणि एन-8 मधील यशोधरा कॉलनीतील 48 वर्षीय पुरुष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरातील एका खासगी रुग्णालयात न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरा नगर येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरुष उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील 140, औरंगाबाद शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 50, मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकूण मृताची संख्या 191 वर आहे.
मनपा कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, जिल्हा रुग्णालय, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1 हजार 968 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.