ETV Bharat / state

कोरोनाग्रस्त कामावर..?, 'रोहयो'च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप - राष्ट्रवादी बातमी

कोरोनाग्रस्त असलेल्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत कामावर असल्याचे दाखवून या योजनेतून भ्रष्टाचार केले जात असल्याचा आरोप राष्ट्रावादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी केला आहे.

दत्ता गोर्डे
दत्ता गोर्डे
author img

By

Published : May 22, 2021, 7:46 PM IST

औरंगाबाद - कोरोनाग्रस्त असलेल्यांना रोजगार हमी योजनेंतर्गत कामावर असल्याचे दाखवून या योजनेतून भ्रष्टाचार केले जात असल्याचा आरोप राष्ट्रावादीचे नेते दत्ता गोर्डे यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे यांच्याच मतदार संघात घडला आहे.

बोलताना दत्ता गोर्डे

काम जानेवारीतच पूर्ण पण हजेरी सुरूच

औरंगाबाद-बीड महामार्गावरील बायपास साजेगाव रोड या रस्त्याचे काम रोजगार हमी योजनेतून विविध यंत्र प्रणाली वापरून जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप हे काम सुरू असून या कामासाठी पाच जणांची हजेरी सुरूच आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी काही जण कोरोनाग्रस्त असून त्या काळातही त्यांची हजेरी लावण्यात आली आहे, असा आरोप गोर्डे यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी समितीद्वारे चौकशी करावी

कोरोना काळात अनेकांना रोजगाराचा प्रश्न उद्भवत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही अशाप्रकारचा भ्रष्टाचार मंत्र्यांच्या मतदार संघात होत असून मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमावी, अशी मागणी गोर्डे यांनी केली आहे. याबात रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

हेही वाचा - जाधववाडी बाजारात युवकाचा दगडाने ठेचून खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.