ETV Bharat / state

Abhay Patil Chikatgaonkar Enter BJP : अभय पाटील चिकटगावकर यांचा भाजपात पक्ष प्रवेश

राष्ट्रवादीचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांनी बुधवारी (दि. 16 फेब्रुवारी) मुंबई येथे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस व केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला ( Abhay Patil Chikatgaonkar Enter BJP ) आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Feb 16, 2022, 7:12 PM IST

वैजापूर ( औरंगाबाद ) - तालुक्यातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. माजी आमदार दिवंगत कैलास पाटील चिकटगावकर यांचे सुपुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर यांनी आज (दि. 16 फेब्रुवारी) मुंबई येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस ( Devendra Fadnavis ) व केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड ( Central Minister of State Bhagwat Karad ) यांच्या उपस्थित भाजपात प्रवेश केला ( Abhay Patil Chikatgaonkar Enter BJP ) आहे. मागील तीन महिन्यांपूर्वी अभय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या जिल्हाकार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हपासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, बरेच दिवस हा पक्ष प्रवेश झाला नाही त्यांचे कारण मात्र समोर आलेले नसले तरी आता मात्र त्यांनी हातातले घड्याळ काढून अखेर कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे तालुक्यातील अभय पाटील चिकटगावकर यांच्या भाजप पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादीला तालुक्यात खिंडार पडले, असे आपण म्हणून शकतो.

माजी आमदार दिवंगत कैलास पाटील चिकटगावकर यांच्या निधनानंतर पुत्र अभय पाटील चिकटगावकर हे राजकारणात सक्रीय होत कार्यकर्त्यांची मोठ बांधली. युवा पिढीची भक्कम साथ व आपल्या खमक्या कार्यपद्धतीने अभय पाटील यांनी अल्पावधित स्वतःचे राजकीय वलय तयार केले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी मतदारसंघात चाचपणी करून उमेदवारी अभय पाटील यांना दिली. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. विधानसभा निवडणुकीनंतर अभय पाटील केवळ पक्षात राहिले. मात्र, पक्षाच्या कार्यक्रम, मेळाव्याला त्यांची अनुपस्थिती दिसून आली. जिल्हा कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी पक्षात पुन्हा सक्रिय असणे आवश्यक होते. मात्र, झाले उलटेच. त्यांनी आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता थेट कमळ हाती घेतल्याने काका-पुतण्याच्या वादाचा अजून एक अकडा महाराष्ट्रात वाढला, अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे.

वैजापूर तालुक्यातील राजकीय समीकरण हे चिकटगावकर घराण्याशिवाय अपूर्ण आहे. त्यात काका-पुतण्याचे शितयुद्ध बघायला मिळेल, अशी चर्चा आहे. येत्या तीन महिन्यांत मिनी मंत्रालय म्हणून संबोधल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक होणार आहे. काका-पुतण्यापैकी महत्त्वाची भूमिका कोण बजावेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा - Boy Suicide In Aurangabad : बेंचवर बसण्याच्या कारणावरून धमकी, मुलाने केली आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.