ETV Bharat / state

MIM Protest: रस्त्यावरील खड्डे न बुजवल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात 'एमआयएम'चे मुंडन आंदोलन - एमआयएम आंदोलन

गंगापूर ते कायगाव टोका मार्गावरील अपघातास कारणीभूत असलेले खड्डे न बुजवल्यामुळे व तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान समोरील १०० फूट सोडण्यात आलेल्या (MIM Protest) रस्त्याचे डांबरीकरण न केल्याने गंगापूर एमआयएम पक्षाच्या (Mundan protest of MIM) वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग व भ्रष्ट ठेकेदाराच्या विरोधात गंगापूर कायगाव रोड वर मुंडन आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी या खड्ड्यांचे पूजन करून निषेध व्यक्त केला. (MIM against Public Works Dept)

MIM Protest
'एमआयएम'चे मुंडन आंदोलन
author img

By

Published : Jul 4, 2023, 10:52 PM IST

रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांविषयी एमआयएमच्या पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर: कायगाव ते देवगाव मार्गाचे काम निकृष्ट झाले (MIM Protest) असून या मार्गावर मोठमोठाले खड्डे पडल्याने अनेक अपघात होऊन यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. (Mundan protest of MIM) वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम व ठेकेदार याकडे लक्ष देत नसल्याने एमआयएमकडून मुंडन आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (MIM against Public Works Dept)

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष: 'एमआयएम' पक्षाच्या वतीने दिनांक २२ जून रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग गंगापूर यांना निवेदन देऊन खड्डे बुझविण्याची मागणी करण्यात आली. गंगापूर-कायगाव रोडवरील पडलेल्या खड्ड्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोरही असेच खड्डे असल्याने अपघात होत असल्याने गंगापूर ते कायगाव रोड वरील खड्डे त्वरित बुजवावे अशी मागणी केली गेली. मात्र, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने गंगापूर-कायगाव-टोका रोडवरील खड्ड्यांचे पूजन करून त्याच खड्ड्यात बसून एमआयएमचे तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, सरवर जहुरी, अजीस सय्यद आदींनी मुंडन केले.

आंदोलनात यांची उपस्थिती: यावेळी खड्ड्यात बसून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भ्रष्ट सार्वजनिक विभाग व भ्रष्ट ठेकेदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, पोलीस राहुल वडमारे, बरडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. तर यावेळी तालुका संघटक वैभव खाजेकर, शहर अध्यक्ष फैसल बासोलान, ता. उपाध्यक्ष अशपाक सय्यद, युवा शहर अध्यक्ष नदीम खान, शहर सचिव इम्रान खान, सल्लागार सरवर जहुरी, मुबिन शेख, हाकीम शेख, जमीर शेख, सलमान बासोलान, मोहसीन शेख, सोनू शेख, सालमीन चाऊस, दयानंद खाजेकर, अमजद पठाण, अजीस सय्यद, सलमान बागवान, आरिफ बागवान, अतिक कुरेशी, खिजर शहा, हुसेन शेख, शोएब बासोलान, उमर बाकोदा, नाजीम सय्यद, अबरार कुरेशी, फैज बासोलान, अफरोज बागवान, आरिफ बागवान, साजिद पठाण, रहीम शेख, अजीम बागवान, दीपक जाधव, संतोष गायकवाड, सोनू बागवान आदींची या आंदोलनात उपस्थिती होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.