औरंगाबाद - शहरातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील दोन वाघ मुंबईच्या वीर जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयात (भायखळा प्राणीसंग्रहालय) पाठवण्यात येणार आहेत. या दोन वाघांच्या बदल्यात सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाला विविध पक्षी दिले जाणार आहेत, अशी माहिती सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी रविवारी दिली.
औरंगाबाद महानगरपालिका संचलित सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. येथे वाघांची संख्या जास्त असल्याने वाघ-पक्षी देवाणघेवाण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, बी एस नाईकवाडे यांनी सांगितले.
हेही वाचा- ऑल इंडिया उलमा बोर्डाचा वंचितला धक्का, आंबेडकरांचे विधान बोर्डाने लावले धुडकावून
सध्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात 12 वाघ आहेत. यापैकी दोन वाघ मुंबईच्या वीर जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयाला आम्ही देणार आहोत. या बदल्यात विविध पक्षी या उद्यानातून सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाला देण्यात येणार आहेत. याबाबतची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी दोन अधिकारी मुंबईतील उद्यानाला भेट देणार आहेत, अशी माहितीही नाईकवाडे यांनी दिली.
हेही वाचा- एमआयएम विधानसभेच्या 20 टक्के जागा लढवणार - इम्तियाज जलील