ETV Bharat / state

औरंगाबादमध्ये मराठा आंदोलनातील १ हजार २३५ जणांना पुन्हा नोटीसा - गुन्हा

मराठा क्रांती मोर्चा ११
author img

By

Published : Mar 29, 2019, 3:19 PM IST

Updated : Mar 29, 2019, 5:41 PM IST

2019-03-29 13:59:07

निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने नोटीस बजावल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रोष व्यक्त केलाय.

औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाच्या जवळपास १ हजार २३५ जणांना पुन्हा नोटीस बजावत नव्याने जामीन घेण्यास सांगितल्याने मराठा समाजात रोष निर्माण झाला आहे. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांनी ही नोटीस बजावली आहे.

नोटीसमध्ये विविध पोलीस ठाण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी मोर्चातील बांधवाना जामीनदारासह २५ हजारांचा जामीन भरणे आणि तुम्हाला बंदपत्र का करू नये, यांसंबंधी औरंगाबादमधील जवळपास १ हजार २३५ जणांना ही नोटीस देण्यात आली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. आंदोलकांवर असणारे किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. गुन्हे मागे घेतले गेले नाहीत मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने नोटीस बजावल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रोष व्यक्त केलाय. याप्रकरणी प्रशासनाने आमची फसवणूक केल्याची भावना मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केली.

शांततेत असलेल्या मोर्चाने आक्रमक रुप घेतल्यानंतर मराठा क्रांती मोर्चातील अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदने देण्यात आली होती. 

Intro:मराठा क्रांती मोर्चाच्या जगळपास 1235 जणांना प्रश्नाने नोटीस बजावत नव्याने जामीन घेण्यास सांगितल्याने मराठा समाजात रोष निर्माण झालाय.

Body:विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी ही नोटीस बजावली आहे. या नोटीस मधे विविध पोलीस ठाण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष कार्यकारी दंडाधिकार्यांनी मोर्चातील बांधवाना जामीनदारासह 25 हजारांचा जामीन भरणे आणि तुम्हाला बंदपत्र का करू नये, यांसंबंधी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. औरंगाबादमधील जवळपास 1235 जणांना ही नोटीस देण्यात आली आहे.

Conclusion:औरंगाबादेत मराठा क्रांतीमोर्चाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. शांततेत असलेल्या या मोर्चाने आक्रमक रूप घेतल्यानंतर अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. गुन्हे दाखल झाल्यावर हे गुन्हे मागे घेण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या अद्याप पूर्णतः मान्य झाल्या नाहीत. आंदोलकांवर असणारे किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ते गुन्हे मागे घेतले गेले नाहीत मात्र निवडणुकीच्या तोंडावर अश्या पद्धतीने नोटीस बजावल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी रोष व्यक्त केलाय. प्रशासनाने आमची फसवणूक केल्याची भावना मराठा क्रांतीमोर्चाच्या समन्वयकांनी व्यक्त केली.

byte - मनोज गायके - मराठा क्रांती मोर्चा समन्वयक
Last Updated : Mar 29, 2019, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.