ETV Bharat / state

धार्मिक सोहळे आनंदमय वातावरणात साजरे करू द्या; खासदार इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - वारी

एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांच्या जुन्या परंपरेनुसार दिंडीद्वारे पायी वारीची, गणेश उत्सव उत्साहात व आनंदमय वातावरणात तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास परवानगी देवुन महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करुन सहकार्य करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

खासदार इम्तियाज जलील
खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Jul 7, 2021, 7:00 PM IST

औरंगाबाद - एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यास पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांच्या जुन्या परंपरेनुसार दिंडीद्वारे पायी वारीची, गणेश उत्सव उत्साहात व आनंदमय वातावरणात तसेच बकरी ईद धार्मिक परंपरेनुसार साजरी करण्यास परवानगी देवुन महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर करुन सहकार्य करण्याची मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोनामुळे पडलेला खंड दूर करा -

खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात नमुद केले की, गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहता सर्वच धर्माच्या भाविकांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला आणि सरकारला आवश्यक ते सगळे सहकार्य केले होते. आता कोरोनाची स्थिती आटोक्यात आलेली असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या धार्मिक परंपरेत खंड पडू नये म्हणुन शासनास सहकार्याची भुमिका घेणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे सावट कमी झाल्यानंतर सुध्दा धार्मिक सण, उत्सव व कार्यक्रमांवर अनेक कठोर निर्बंध लादलेले असल्याने सर्वच समाजाच्या धार्मिक भावना दुखावलेले असल्याची खंत व्यक्त केली.

वारीची परंपरा कायम ठेवा -

गेल्या अनेक वर्षापासून आणि जुन्या परंपरेनुसार महाराष्ट्रातील वारकरी पायी दिंडीद्वारे वारकऱ्यांसह पंढरपूर येथे वारी करुन एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक दरवर्षी या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात. तसेच मोठ्या उत्साहाने दिंडीचे स्वागत करतात. वारकऱ्यांना पायी वारी करण्यासाठी दिंडीत सहभागी होऊ न देणे, छळ करणे आणि कायदेशीर कारवाई करुन अटक करण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे नमुद केले.

उत्सवामुळे व्यावसायिकांना होईल मदत -

खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रात पुढे नमुद करताना म्हटले की, श्री. गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असुन त्या उत्सवानिमित्त दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. महाराष्ट्रातील गणेशमुर्ती निर्मितीचे काम करणारे कारागीर, गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य विक्री करणारे छोटे-छोटे व्यापारी व त्यावर अवलंबुन असलेल्या वस्तुंची विक्री करणारे व्यापाऱ्यांचे संपुर्ण वर्षभराचा उदरनिर्वाह हे गणेश उत्सवावरच अवलंबुन असते. गणेश उत्सव आनंदमय वातारवणात व्हावे व सर्वांना गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य वेळेवर व शांततामय वातावरणात उपलब्ध व्हावे म्हणुन वर्षभर आकर्षक गणेशमुर्ती व त्यासाठी लागणारे साहित्य बनविण्याचे अनेकजण काम करित असतात. गणेश भक्तांना उत्साहात व परंपरेनुसार उत्सव साजरा करण्याची परवानगी दिल्यास त्यांचे आनंद व्दिगुणीत होईल आणि छोट्या व्यापाऱ्यांना त्यांनी वर्षभर केलेले परिश्रम सार्थक ठरतील. अधिक उत्साहामध्ये हा सण साजरा करण्यासाठी गणेश भक्तांना मोठी सुविधा उपलब्ध करुन दिल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीचा परिणाम राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सुध्दा होणार आहे.

ईदचा सण साजरा करू द्या -

ईद-उल-अजहा (बकरी ईद) मुस्लिम समाजाचे अत्यंत महत्वाचे सण असुन अनेक कालखंडापासुन संपुर्ण जगासह राज्यात धार्मिक रितीरिवाज व परंपरेनुसार एकाच पध्दतीने मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्याची जुनी परंपरा आहे. बकरी ईद सणानिमित्त अनेक छोटे-छोटे व्यापारी, शेतकरी व त्यावर अवलंबुन असलेल्या वस्तुंची विक्री करणारे व्यापाऱ्यांचे संपुर्ण वर्षभराचे उदरनिर्वाह अवलंबुन असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.