ETV Bharat / state

लोकसभेत आम्ही पंतप्रधानांची वाढलेली दाढी बघायला यावे का? इम्तियाज जलील यांची टीका - इम्तियाज जलील प्रश्नोत्तराचा तास रद्द टीका

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभेचे अधिवेशन घेण्यात आले नव्हते. देशात अनलॉक केल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन बोलवण्यात आले. मात्र, या अधिवेशनात लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत. जर प्रश्नोत्तराचा तास नाही तर अधिवेशनाला जाण्याचा फायदा काय? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

Imtiyaz Jaleel
इम्तियाज जलील
author img

By

Published : Sep 9, 2020, 7:15 PM IST

औरंगाबाद - लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये प्रश्नोत्तराचा तास रद्द केल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. लोकसभेत जर खासदारांना प्रश्न उपस्थित करण्याची परवानगी मिळणार नसेल तर ऑनलाइन पद्धतीने हे अधिवेशन चालवावे. आम्हाला मोदींची वाढलेली दाढी बघायला दिल्लीपर्यंत जाण्याची गरज नाही, असा टोला जलील यांनी लगावला.

इम्तियाज जलील यांनी नरेंद्र मोदींवर टीका

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभेचे अधिवेशन घेण्यात आले नव्हते. देशात अनलॉक केल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन बोलवण्यात आले. मात्र, या अधिवेशनात लोकप्रतिनिधींना आपले प्रश्न उपस्थित करता येणार नाहीत. जर प्रश्नोत्तराचा तास नाही तर अधिवेशनाला जाण्याचा फायदा काय? असा प्रश्न इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला.

14 सप्टेंबरपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. या काळामध्ये जे खासदार उपस्थित राहतील त्यांना प्रश्नोत्तराचा तास मिळणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आदेश काढले आहेत. आम्ही काय इमारत, मोदींची दाढी किती वाढली आहे किंवा अमित शाह किती जाड झाले हे बघण्यासाठी येणार का? असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला. लोकप्रतिनिधींना प्रश्न उपस्थित करायचे असतात, त्यासाठीच तो लोकसभेत येतो. आम्हाला आमच्या भागातील प्रश्न उपस्थित करता येत नसतील किंवा देशाचा कारभार चालवणाऱ्या सरकारने घेतलेल्या निर्णयांवर आम्हाला आमचे मत मांडता येत नसेल, तर लोकसभेला दिल्लीला जाण्यापेक्षा पंतप्रधानांनी ऑनलाइन पद्धतीने हे अधिवेशन घ्यायला हवे. त्यांना फक्त त्यांच्या 'मन की बात' ऐकवायची आहे तर त्यासाठी आम्हाला दिल्लीला बोलावण्याची गरज नाही, असे इम्तियाज जलील म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.