ETV Bharat / state

शालेय शुल्क दिलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवल्यामुळे मनसेचे जैन इंटरनॅशनल शाळेत 'खळ्ळ खट्याक' - Jain international school auranagabad

औरंगाबादेतील जैन इंटरनॅशल शाळा पालकांकडून शाळा बंद असताना कॅन्टीन व बसची फी आकारत होती. जे पालक ही फी भरत नव्हते त्यांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. याबाबत मनसेने निवेदन देऊनही शाळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवल्याने मनसैनिकांनी शाळेत खळ्ळ खट्याक केला.

खळ्ळखट्याक करताना मनसैनिक
खळ्ळखट्याक करताना मनसैनिक
author img

By

Published : Oct 15, 2020, 8:51 PM IST

औरंगाबाद - शालेय शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित ठेवणाऱ्या शाळेत मनसे त्यांच्या शैलीत राडा केला. जैन इंटरनॅशनल शाळेत मनसेने खळ्ळखट्याक केले आहे. वारंवार निवेदन देऊनही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवल्याने मनसे स्टाईल राडा करावा लागला, अशी भूमिका मनसेतर्फे जाहीर करण्यात आली.

बोलताना मनसैनिक

गेल्या काही दिवसांपासून जैन इंटरनॅशनल शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाते आहे. पालकांना शुल्क भरण्यासाठी दबाव टाकला जात आहे. शाळा प्रशासनाला आणि शिक्षण विभागाला याबाबत वारंवार निवेदन देऊनही शाळांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देणे बंद केल्याने मनसेला ही भूमिका घ्यावी लागली, असे मनसेचे राजू जावळीकर यांनी सांगितले.

मनसेतर्फे याआधी शिक्षण विभागाला जैन इंटरनॅशनल शाळेच्या विरोधात निवेदन देण्यात आले होते. शाळा पालकांकडून मोठ्या प्रमाणात वार्षिक शुल्क आकारत आहे. शाळा बंद असतानाही कॅन्टीन सुविधा, बस सुविधेचे शुल्क पालकांना आकारत आहे. जे पालक शुल्क देत नाहीत त्यांच्या पाल्यांना ऑनलाइन क्लासपासून शाळा वंचित ठेवत आहेत. इतकेच नाही तर विद्यार्थ्यांना वही, पुस्तक इतर साहित्य घेण्यासाठी सांगत आहे. काही दिवसांपासून शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन लिंक देणे बंद करण्यात आले. याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारला असता शाळतर्फे उडवाउडवीची उत्तर दिल्याने मनसे कार्यकर्त्यानी शाळेत तोडफोड केली. औरंगाबाद जिल्ह्यात मनमानी कारभार करणाऱ्या शाळांविरोधात मनसे स्टाईल आंदोलन होईल,अशी भूमिका मनसेने जाहीर केली.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये नेटवर्क नसल्यामुळे ग्राहकांचा वोडाफोनवर रोष

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.