औरंगाबाद - वाढीव वीजबिलाविरोधात मनसे आक्रमक झाली असून, औरंगाबादेत वीजवितरणविरोधात मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली. तरीदेखील आंदोलन होणारच, अशी भूमिका मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी जाहीर केली.
वाढीव वीजबिलाविरोधात मनसेने दोन दिवसांपूर्वी आंदोलनाचा इशारा देत वीजबिले फाडून वीजवितरण अधिकाऱ्यांच्या तोंडावर भिरकावली होती. वाढीव वीजबिलाबाबत निर्णय घ्या. अन्यथा, आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता. मात्र राज्य सरकारने भूमिका जाहीर न केल्याने मनसेने राज्यव्यापी आंदोलन जाहीर केले. मात्र, पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नसतानाही मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी औरंगपुरा भागात आंदोलन केले. आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी..
हेही वाचा - रेल्वे, विमान प्रवासावर लक्ष केंद्रित करताना राज्याच्या सीमांकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष