ETV Bharat / state

शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा; आमदार राजपूत यांची पालकमंत्री देसाईंकडे मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी तसेच याबाबत उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील आमदारांची मते जाणून घेतली. आमदार उदयसिंग राजपूत यांनी विविध विषयांवर चर्चा करीत असताना सामान्य जनतेला आधार देण्यासाठी उपाय सुचवले.

mla udaysingh rajput demandes starting cotton buying center with vc
शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा; आ. उदयसिंग राजपूत यांची पालकमंत्री सुभाष देसाईंकडे मागणी
author img

By

Published : Apr 25, 2020, 12:41 PM IST

Updated : Apr 25, 2020, 1:36 PM IST

कन्ऩड (औरंगाबाद )- कापूस उत्पादक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी त्वरित शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा. रेशनच्या लाभधारकांना नियमानुसार धान्य मिळत आहे. मात्र, काही गरजू कुटुंबाकडे रेशनकार्ड नसल्याने त्यांना धान्य मिळत नाही. त्यामुळे रेशनकार्ड नसल्याने गरजू कुटुंबांना शासनाच्या वतीने धान्य देणे गरजेचे असून शासकीय कामे सुरू केल्यास बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल, अशा विविध उपाययोजना आमदार उदयसिंग राजपूत यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सुचविल्या.

शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करा; आमदार राजपूत यांची पालकमंत्री देसाईंकडे मागणी

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा जाणून घेण्यासाठी तसेच याबाबत उपाययोजना करण्यासाठी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जिल्ह्यातील आमदारांची मते जाणून घेतली. याप्रसंगी आमदार उदयसिंग राजपूत यांनी विविध विषयांवर चर्चा करीत असताना सामान्य जनतेला आधार देण्यासाठी विविध उपाययोजना विषयी आपले मत व्यक्त केले.

कोरोनाचा आढावा देत असताना आमदार उदयसिंग राजपूत कन्नड़-सोयगाव मतदार संघामध्ये पोलीस व महसूल विभाग लॉकडाऊन तसेच जिल्हाबंदीचे काटेकोरपणे अमलबजावणी करीत आहे. सुदैवाने कन्नड़- सोयगाव मतदारसंघात आतापर्यंत कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. औरंगाबाद ग्रामीणमध्ये कोरोनाचा शिरकाव नाही. मतदारसंघातील सोयगाव तालूका अतिदुर्गम भाग असून औरंगाबाद पासून 120 किमी दूर आहे. शिवाय मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र नसल्याने बहुतांशी कामगार हे बांधकाम करणारे आहेत. लॉकडाऊनमध्ये बांधकाम बंद असल्याने बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. ते सुरू करुन सोशल डिस्टन्सिंग ठेऊन काम करता येईल जेणे करुण कामगारांना रोजगार निर्माण होऊन जाईल, हेही राजपूत यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांना सुचवले.

Last Updated : Apr 25, 2020, 1:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.