औरंगाबाद - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे पैठण तालुक्यावर विशेष प्रेम असून त्यात मी मंत्री असल्याने पैठण तालुक्याला कुठलाच निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आमदार संदीपान पाटील भुमरे यांनी केले. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाच्या कामाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
तालुक्याचा शैक्षणिक, औद्योगिक आणि शेती क्षेत्रात विकास केल्याशिवाय शांत बसणार नाही. पैठण या ठिकाणी असलेले संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी मी क्रियाशील असून यात साडेतीनशे एकर जमिनीमध्ये विविध उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे, आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार भुमरे म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपल्याला कोणताही निधी कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार अंबादास दानवे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, विलास भुमरे, राजू नाना भुमरे, बाबुराव पडूळे, बळीराम औटे, नंदलाल काळे, सोमनाथ परदेशी, विनोद बोंबले, तहसीलदार चंद्रकांत शेळके, आतिश गायकवाड , राखी परदेशी, नगरसेविका संगीता मापारी , संतोष गव्हाणे , संतोष तांबे , पोलीस निरीक्षक किशोर पवार, दादासाहेब पठाडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.