औरंगाबाद - शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. 20 मे 2018 च्या मध्यरात्री औरंगाबादेत झालेल्या जातीय दंगली प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना सोडवण्यासाठी जैस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यातील खुर्चा आणि काचांची मोडतोड करून पोलिसांना शिवीगाळ केली होती. याप्रकरणी प्रदीप जैस्वाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
2018 मध्ये झाली होती दंगल -
19 मे 2018 रोजी मध्यरात्री शहागंज भागात दोन समाजात जातीय दंगल उसळली होती. यामध्ये अनेक दुकानांचे नुकसान करत काही दुकान जाळण्यात आली होती. यात काही नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. याप्रकरणी काही लोकांना संशयित म्हणून पोलिसांनी तव्यात घेतले होते. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या संशयितांना सोडवण्यासाठी त्यावेळचे माजी खासदार आणि आताचे शिवसेना आमदार प्रदीप जैस्वाल यांनी क्रांतिचौक पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत साहित्याची तोडफोड केली होती.
हेही वाचा - मुंबईतील अँटॉप हिल परिसरात 31 वर्षीय तरुणाची कोयत्याने वार करुन हत्या