औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व ठीक चालले आहे, असे तिन्ही पक्ष सांगत असले तरी प्रत्यक्षात अंतर्गत कुजबुज सुरू असल्याच वारंवार समोर येत आहे. ( Dispute in Mahavikas Aghadi ) काँग्रेसचा पालकमंत्री नसलेल्या ठिकाणी अडचणी येतात, अशी खंत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ( Minister Vijay Wadettiwar ) यांनी व्यक्त केले. ते औरंगाबाद दौऱ्यावर होते. ( Minister Vijay Wadettiwar on Aurangabad Visit ) यावेळी त्यांनी काँग्रेस मेळाव्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ( Minister Vijay Wadettiwar in Aurangabad Congress Melava )
पालकमंत्री नसल्याने होतेय अडचण -
राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार औरंगाबाद दौऱ्यावर असताना झालेल्या काँग्रेस मेळाव्यात त्यांनी पक्षाच्या वाटचाली बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी ज्या-ज्या ठिकाणी कॉंग्रेसचे पालकमंत्री नाही, त्याठिकाणी आपल्याला अडचणी येत आहेत. असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या शिवसेनेवर निशाणा साधला. आमच्या समन्वय समिती समोर तसेच हा मुद्दा कॅबिनेटमध्ये सुद्धा मांडेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - Mann Ki Baat : 'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या
भाजपला धक्का द्यायचाय -
यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, काही गोष्टी आपल्यालाही समजून घ्यावी लागतील. आपल्याला सरकार पाच वर्ष टिकवायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला भाजपच्या १०६ आमदारांची संख्या २५ वर आणायची आहे. तसेच तोपर्यंत स्वतः बसायचं नाही, असे आवाहनही त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले.