सिल्लोड ( औरंगाबाद) मराठा समाजाला मिळालेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. आरक्ष रद्द झाल्याने मराठा समाजामधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. दरम्यान आरक्षण मिळून देण्यासाठी मराठा समाजातील आमदार, खासदार अयशस्वी झाले, असा आरोप मराठा समाजातील काही तरुणांनी केला आहे. याचा निषेध म्हणून मराठा समाजाच्या काही तरुणांकडून निल्लोड येथे समाजातील आमदार, खासदारांचे पिंडदान करण्यात आले.
मराठा आरक्षण रद्दचा निर्णय येऊन, दहा दिवस पूर्ण झाले आहेत, मात्र अद्यापही कुठल्याही लोकप्रतिनिधीने आरक्षणाचा पाठपुरावा केला नाही. दहा दिवस पूर्ण झाल्याने आम्ही समाजातील आमदार, खासदारांचे पिंडदान करत आहोत, अशा संतप्त भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत. दरम्यान यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
हेही वाचा - ऐरोलीत १४ वर्षाच्या मुलाचा डबक्यात बुडून मृत्यू