ETV Bharat / state

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला सर्वांचा हातभार आवश्यक - दिवाकर रावते

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेले हुतात्मे, थोर समाजसुधारक यांच्या लढ्यामुळे महाराष्ट्र दिन आज राज्यभरात थाटात साजरा होत आहे. दूरदृष्टी आणि अद्वितीय अशा संघर्षातून निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वांचा हातभार आवश्यक असल्याचे, प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केले, ते आज औरंगाबाद येथे बोलत होते.

author img

By

Published : May 1, 2019, 1:00 PM IST

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला सर्वांचा हातभार आवश्यक - दिवाकर रावते

औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेले हुतात्मे, थोर समाजसुधारक यांच्या लढ्यामुळे महाराष्ट्र दिन आज राज्यभरात थाटात साजरा होत आहे. दूरदृष्टी आणि अद्वितीय अशा संघर्षातून निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वांचा हातभार आवश्यक असल्याचे, प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी केले, ते आज औरंगाबाद येथे बोलत होते.

या प्रसंगी बोलताना दिवाकर रावते

औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते झाला. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद पोलिस परिक्षेत्राचे महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदी उपस्थित होते.

दिवाकर रावते यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर रावते यांनी परेडचे निरीक्षण केले. सामुहिक संचलनात पोलीस विभागाच्या विविध पैलूंचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिकांची उपस्थिती होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तो हा दिवस. या दिवशी देशातील मराठी राज्य निर्माण झाले. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सुध्दा साजरा केला जातो.

संयुक्त महाराष्ट्र समितीने दिल्ली येथे सत्याग्रह केला. “तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे” असे तत्कालीन पंतप्रधानांना सुनावले. तर भारताचे तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्रावर अन्याय झाल्यामुळे अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचे हस्ते मुंबई शिवतिर्थावर महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांचेकडे सोपवण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मिळाला.

अद्वितीय लढ्यातून आणि बलिदानातुन निर्माण झालेला महाराष्ट्र आहे. 59 वर्षानंतरही संपूर्ण महाराष्ट्र निर्मिती अजूनही अपूर्ण आहे. 1969 साली सीमा भाग संबंधात महाजन कमिशन गाडून टाकावे, यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात आला. या लढ्यात 69 हुतात्म्यांचे बलिदान हे विसरता येत नाही. त्यांना मानवंदना दिल्याशिवाय आजचा दिवस साजरा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे संघर्षातून निर्माण झालेला आणि मराठी अस्मिता जपणारा महाराष्ट्र, मराठी राज्यभाषेची झूल घेऊन अभिमानाने वाटचाल करत असल्याचे मत दिवाकर रावते यांनी व्यक्त केले.

Intro:महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्मयांमुळे, थोर समाजसुधारकांच्या लढ्यामुळे महाराष्ट्र दिन राज्यभरात आज थाटात साजरा होतो आहे. दूरदृष्टी आणि अद्वितीय अशा संघर्षातून निर्माण झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वांचा हातभार आवश्यक असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथे केले.Body:औरंगाबादच्या पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते झाले. यावेळी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबाद पोलिस परिक्षेत्राचे महानिरीक्षक रवींद्र सिंघल, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.Conclusion:दिवाकर रावते यांच्याहस्ते ध्वजारोहण करून झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर रावते यांनी परेडचे निरीक्षण केले. सामुहिक संचलनात पोलिस विभागाच्या विविध पैलूंचे सादरीकरण झाले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वातंत्र्यसैनिकांची उपस्थिती होती. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तो हा दिवस. या दिवशी देशातील मराठी राज्य निर्माण झाले. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सुध्दा साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्र समितीने अद्वितीय असा दिल्लीला प्रचंड सत्याग्रह केला. “तुमच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे” असे तत्कालीन पंतप्रधानांना सुनावत भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी, महाराष्ट्रावर अन्याय झाल्यामुळे त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. 1 मे 1960 महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. भारताचे पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे हस्ते मुंबई शिवतिर्थावर महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांचेकडे सोपविण्यात आला. यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा सन्मान मिळाला. अशा या अद्वितीय लढ्यातून आणि बलिदानातुन निर्माण झालेला हा महाराष्ट्र. 59 वर्षानंतरही संपूर्ण महाराष्ट्र निर्मिती अजूनही अपूर्ण आहे. 1969 साली सीमा भागांसंबंधात महाजन कमिशन गाडून टाकावं यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उभारलेला तीव्र लढा, त्याकरीता 69 हुतात्मयांचे बलिदान हे विसरता येत नाही. त्यांना मानवंदना दिल्याशिवाय आजचा दिवस साजरा करणे उचित ठरणार नाही. असा हा संघर्षातून निर्माण झालेला मराठी अस्मिता जपणारा महाराष्ट्र, मराठी राज्यभाषेची झूल घेऊन अभिमानाने वाटचाल करत असल्याचे दिवाकर रावते म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.