ETV Bharat / state

महापोर्टलमध्ये मध्यप्रदेशातील व्यापमपेक्षाही मोठा घोटाळा - राजू शेट्टी

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने औरंगाबादच्या क्रांतिचौक भागातून मोर्चा काढला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना
author img

By

Published : Sep 16, 2019, 4:21 PM IST

Updated : Sep 16, 2019, 4:32 PM IST

औरंगाबाद - मध्यप्रदेशात झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महापोर्टलमध्ये झाला आहे. त्यामुळे यापुढील सरकारी नोकर भरतीच्या परीक्षा एमपीएससीद्वारे घ्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने औरंगाबादच्या क्रांतिचौक भागातून मोर्चा काढला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह महापोर्टलच्या विरोधात युवकांना एकत्र करून विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकला. सरकारने महापोर्टलच्या माध्यमातून युवकांची फसवणूक केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी यावेळी केला.

हेही वाचा- 'स्वाभिमानी'कडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर फेकल्या कडकनाथ कोंबड्या व अंडी

महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या नोकर भरतीत घोटाळा झाल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारतर्फे घेण्यात येणारी नोकर भरती फसवी आहे. त्यामुळे सरकार युवक आणि बेरोजगारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत आहे. सरकारी नोकर भरती एमपीएससी मार्फतच करण्यात यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. सरकार शेतकऱयांबाबत राबवत असलेले धोरण शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहे, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.

हेही वाचा- कलम ३७० प्रमाणेच मोदी सरकारने राममंदिर निर्मितीचाही निर्णय घ्यावा - उद्धव ठाकरे

या मोर्चात शेतकरी संघटनेच्या झेंड्या ऐवजी देशाचा तिरंगा झेंडा घेऊन युवक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना सभेत जाब विचारला असता त्यांनी उत्तर न देता 'भारत माता, की जय' असा नारा देत भाषण संपवले होते. त्याचा निषेध यावेळी शेतकरी संघटनेने केला.

हेही वाचा- भाजप शिवसेनेला दाखवणार कात्रजचा घाट?

Intro:मध्यप्रदेशात झालेल्या व्यापम घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा महापोर्टलमध्ये झाल्याने घेण्यात येणाऱ्या परीक्षा एमपीएससी द्वारे घ्याव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने औरंगाबादच्या क्रांतिचौक भागातून मोर्चा काढण्यात आला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

Body:शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसह महापोर्टलच्या विरोधात युवकांना एकत्र करून विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा धडकला. सरकारने महापोर्टलच्या माध्यमातून युवकांची फसवणूक केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी आंदोलनात केला.

Conclusion:महापोर्टल द्वारे घेण्यात येणाऱ्या नौकर भरतीत घोटाळा झाल्याच समोर आलं. त्यामुळे सरकार तर्फे घेण्यात येणार नौकर भरती फसवी आहे. त्यामुळे युवक आणि बेरोजगारांची फसवणूक मोठ्या प्रमाणात सरकार करत आहे. सरकारी नौकर भरती एमपीएससी मार्फतच करण्यात यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. सरकार शेतकऱयांबाबत राबवत असलेले धोरण शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे आहेत. असा आरोप राजू शेट्टी यांनी केला. शेतकरी संघटनेच्या वतीने औरंगाबाद येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शेतकरी संघटनेच्या झेंड्या ऐवजी देशाचा तिरंगा झेंडा घेऊन युवक आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले होते. युवकांच्या आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांना सभेत जाब विचारला असता त्यांनी उत्तर न देता भारत माता की जय असा नारा देत भाषण संपवले होते. त्याचा निषेध यावेळी शेतकरी संघटनेने केला.
byte - राजू शेट्टी - शेतकरी संघटना नेते
Last Updated : Sep 16, 2019, 4:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.