ETV Bharat / state

पावसाची प्रतीक्षा..! मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट, सर्वच जलसाठे वजा 10.23 वर - long time no rain in marathwada

जुलै महिला अर्धा संपला असला तरी मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. जवळपास सर्वत्र पेरण्या झाल्या असून पीक जगण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

दुबार पेरणीच संकट
author img

By

Published : Jul 17, 2019, 8:44 AM IST

औरंगाबाद- जुलै महिना अर्धा संपला तरी मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा सध्या चिंतेत पडला आहे. मराठवाड्यात जवळपास सर्वत्र पेरण्या झाल्या असून पीक जगण्यासाठी शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करत आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या मनात भीती पसरली आहे.

सतत कमी होणाऱ्या पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात गेल्या काही वर्षात जलसाठे कमी होत चालले आहेत. ऐन जुलै महिन्यात मराठवाड्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठा उणे 10.23 इतका शिल्लक राहिल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जुलै महिला अर्धा संपला असला तरी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यात हवामान खात्याने जुलै महिन्याच्या शेवटी पाऊस पडेल, असा अंदाज वाजत केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मराठवाड्यातील जलसाठ्यांचा विचार केला तर ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील बहुतांश सर्वच जलसाठे मृतावस्थेत आहेत. मराठवाड्यातील छोटी मोठी मिळून 964 धरणे आहेत. त्यातील 0.8 टक्के पाणीसाठा हा चिंतेचा विषय आहे. मागील वर्षी याच महिन्यात मराठवाड्याचा पाणीसाठा 14 टक्क्यांवर होता. मराठवाड्यातील मोठी धरणेसध्या उणे पाणीसाठ्यात आहेत. त्यात जायकवाडी (-)9.75, लोअर दारणा (-)19.80, येलदरी - (-)23.12, सिद्धेश्वर - (-)74.67, माजलगाव - (-) 24.81, मांजरा - (-) 22.11, इसापूर धरण - 0.50, लोअर मण्यार - 9.24, लोअर तेरणा - (-) 16.28, विष्णूपुरी धरण - 00.00, सिना कोळेगाव - (-) 85.87 अशी स्थिती असून एकूण मोठ्या धरणातील पाणीसाठा (-)10.13 इतका आहे. तर पावसाची स्थिती अत्यंत वाईट आहे.

दुबार पेरणीच संकट

मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 16.1 टक्केच पाऊस झाला आहे. ज्यामध्ये औरंगाबाद - 21.5 %, बीड - 14.3 %, जालना - 19.5 %, उस्मानाबाद - 16.4 %, लातूर - 15.6 %, नांदेड -13.4 %, हिंगोली - 14.9 %, परभणी - 15.3 % वार्षिक सरासरीच्या इतके टक्के पाऊस झाला असून मराठवाड्याची टक्केवारी कमी झाली असून जुलै महिन्यात देखील पाऊस समाधानकारक नसेल, असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यात शेतकऱ्यांनी केलेली पेरणी जगवण्यासाठी पावसाची नितांत गरज असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीच संकट उभे होईल त्यावेळी पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून? हा प्रश्न बळीराजाला आहे.

Intro:जुलै महिला अर्धा संपला असला तरी मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. जवळपास सर्वत्र पेरण्या झाल्या असून पीक जगण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाने शेतकऱ्यांच्या मनात भीती पसरली आहे.

Body:सतत कमी होणाऱ्या पर्जन्यमानामुळे मराठवाड्यात गेल्या काही वर्षात जलसाठे कमी होत चालले आहेत. ऐन जुलै महिन्यात मराठवाड्यातील मोठ्या धरणातील पाणीसाठा उणे 10.23 इतका शिल्लक राहिल्याने ऐन पावसाळ्यात मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Conclusion:जुलै महिला अर्धा संपला असला तरी मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. त्यात हवामान खात्याने जुलै महिन्याच्या शेवटी पाऊस पडेल असा अंदाज वाजत केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मराठवाड्यातील जलसाठ्यांचा विचार केला तर ऐन पावसाळ्यात मराठवाड्यातील बहुतांश सर्वच जलसाठे मृतावस्थेत आहेत. मराठवाड्यातील छोटी मोठी मिळून 964 धरणं आहेत. त्यातील 0.8 टक्के पाणीसाठा हा चिंतेचा विषय आहे, मागील वर्षी याच महिन्यात मराठवाड्याचा पाणीसाठा 14 टक्क्यांवर होता. मराठवाड्यातील मोठी धरणं सध्या उणे पाणीसाठ्यात आहेत. त्यात
जायकवाडी - (-)9.75
लोअर दारणा (-)19.80
येलदरी - (-)23.12
सिद्धेश्वर - (-)74.67
माजलगाव - (-) 24.81
मांजरा - (-) 22.11
इसापूर धरण - 0.50
लोअर मण्यार - 9.24
लोअर तेरणा - (-) 16.28
विष्णुपुरी धरण - 00.00
सिना कोळेगाव - (-) 85.87
अशी स्थिती असून एकूण मोठ्या धरणातील पाणीसाठा (-)10.13 इतका आहे.

तर पावसाची स्थिती अत्यंत वाईट आहे. मराठवाड्यात वार्षिक सरासरीच्या 16.1 टक्केच पाऊस झाला आहे. ज्यामध्ये
औरंगाबाद - 21.5 %
बीड - 14.3 %
जालना - 19.5 %
उस्मानाबाद - 16.4 %
लातूर - 15.6 %
नांदेड - 13.4 %
हिंगोली - 14.9 %
परभणी - 15.3 % वार्षिक सरासरीच्या इतके टक्के पाऊस झाला असून मराठवाड्याची टक्केवारी कमी झाली असून जुलै महिन्यात देखील पाऊस समाधानकारक नसेल असा अंदाज हवामान खात्याचा आहे. त्यात शेतकऱ्यांनी केलेली पेरणी जगवण्यासाठी पावसाची नितांत गरज असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पाऊस आला नाही तर दुबार पेरणीच संकट उभं होईल त्यावेळी पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश्न बळीराजाला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.