औरंगाबाद - मार्च महिन्यापासून लागलेल्या लॉकडाऊननंतर पुस्तक विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. सर्वत्र दुकान बंद असल्याने वाचकांना पुस्तकांपर्यंत पोहोचता आले नाही. परिणामी पुस्तक विक्रीवर त्याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. दुसरीकडे ई-वाचकांची संख्या मात्र वाढली आहे. पूर्वी 15 ते 20 टक्के वाचक ही पुस्तके ऑनलाइन पद्धतीने वाचत होती. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या ई-वाचकांची संख्या चार पटीने वाढल्याची माहिती, साकेत प्रकाशनचे साकेत भांड यांनी सांगितली.
पुस्तक विक्रीवर परिणाम झाला असला तरी ई-पुस्तकांचा वाचक वाढला आहे. पूर्वी इ-वाचक कमी होता. मात्र, लॉकडाऊनच्या काळात पुस्तकांचीही दुकाने बंद होती. त्यामुळे वाचकांनी ऑनलाइन वाचनास सुरुवात केली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ई-वाचकांची संख्या चार पटीने वाढली आहे. अनलॉक झाल्यावर वाचक ई-वाचक कमी झाले असले तरी लॉकडाऊनपूर्वीच्या तुलनेत ई-वाचक निश्चित वाढला आहे. त्यामुळे काही प्रकाशन थेट ई-पुस्तक तयार करून घेतल्याची माहिती साकेत प्रकाशनचे साकेत भांड यांनी दिली. पुढील किमान एक ते दीड वर्षतरी अशीच परिस्थिती राहण्याची भीती साकेत भांड यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - संततधारेमुळे शेतकरी अडचणीत; मूग, कांदा पिकांचे नुकसान