ETV Bharat / state

औरंगाबाद जि.प ची सर्वसाधारण सभा ठरली वादळी; भाजपचे सदस्य आणि अध्यक्षांमध्ये खडाजंगी

अध्यक्ष आणि प्राध्यापक सोनवणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाला केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत पुढील सभा चालू ठेवली.

author img

By

Published : Jul 15, 2019, 10:22 AM IST

औरंगाबाद

औरंगाबाद - जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरुवातीलाच वादळी ठरली. मात्र, सभेमध्ये का बोलू दिले जात नाही या विषयावरून भाजपचे सदस्य आणि अध्यक्षांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली.

औरंगाबाद जि.प ची सर्वसाधारण सभा ठरली वादळी; भाजपचे सदस्य आणि अध्यक्षांमध्ये खडाजंगी

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा झाली आहे. या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात लावण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या गुत्तेदार यांनी स्वतः ग्रामपंचायतमध्ये जाऊन लोक भरून घेतले आहेत. या ठिकाणी आठ खेपा पाण्याच्या होत होत्या त्या ठिकाणी फक्त पाचच पाण्याच्या खेपा करण्यात आल्यात. या पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवणाऱ्या गुत्तेदारांची चौकशी करावी या मुद्द्यावर भाजप सदस्य एल. जी गायकवाड यांनी सभागृहात जोरदार ही मागणी लावून धरली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी दिले आहेत. त्यानंतर मला सभेमध्ये का बोलू दिले जात नाही, माझी मुस्कटदाबी केली जाते या मुद्द्यावर सदस्य प्राध्यापक सोनवणे आणि अध्यक्ष यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.

यावेळी सभागृहात गोंधळ उडाला. त्यानंतर अध्यक्ष आणि प्राध्यापक सोनवणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी प्रशासनाला केली होती. परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत पुढील सभा चालू ठेवली. या सभेमध्ये समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांना मंजुरी देण्यात आली. तसेच आरोग्य विभागाच्या औषध खरेदीवर अखर्चित असलेल्या निधीवरही जोरदार चर्चा झाली. त्यानंतर पंचायत विभागाच्या गावठाण शेतीवरही या सभेत चर्चा झाली. या सभेला उपाध्यक्ष केशवराव तायडे, बांधकाम सभापती, महिला व बालकल्याण सभापती, शिक्षण सभापती, सर्व सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होती.

Intro:जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सुरुवातीलाच वादळी ठरली मात्र सभेमध्ये का बोलू दिले जात नाही या मुद्द्यावरून भाजपचे सदस्य आणि अध्यक्षा च्यामध्ये चांगलीच जोरदार बाचाबाची झाली असून आजची झालेली ही सर्वसाधारण सभा चांगलीच वादळी ठरली

Body:
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्यांदाच सर्वसाधारण सभा झाली आहे. या सभेमध्ये जिल्ह्यामध्ये उन्हाळ्यात लावण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टँकरच्या गुत्तेदार यांनी स्वतः ग्रामपंचायत मध्ये जाऊन लोक भरून घेतले आहेत या ठिकाणी आठ खेपा पाण्याच्या होत होत्या त्या ठिकाणी फक्त पाचच पाण्याच्या करण्यात आल्यात या पिण्याच्या पाण्याचे टॅंकर पुरवणाऱ्या गुप्ते दाराची चौकशी करावी या मुद्द्यावर भाजपा सदस्य एल. जी गायकवाड यांनी सभागृहात जोरदार ही मागणी लावून धरली आहे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर यांनी दिले आहेत त्यानंतर मला सभेमध्ये का बोलू देत जात नाही माझी मुस्कटदाबी केली जाते या मुद्द्यावर सदस्य प्राध्यापक सोनवणे आणि अध्यक्ष यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली यावेळी सर्व गोंधळ सभागृहात झाला त्यानंतर अध्यक्ष आणि प्राध्यापक सोनवणे यांना निलंबित करण्यात यावे असे आदेश प्रशासनाला दिले परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत पुढील सभा चालू ठेवलि या सभेमध्ये समाज कल्याण विभागाच्या विविध योजना मंजुरी देण्यात आली तसेच आरोग्य विभागाच्या औषधी खरेदीवर अखर्चित असलेल्या निधीवर ही जोरदार चर्चा झाली आणि पंचायत विभागाच्या गावठाण शेतीवरही या सभेत चर्चा झाली या सभेला उपाध्यक्ष केशवराव तायडे बांधकाम सभापती महिला व बालकल्याण सभापती शिक्षण सभापती सर्व सदस्य आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदींची उपस्थिती होतीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.