ETV Bharat / state

शासकीय वसतिगृहातील जेवणात आढळल्या अळ्या, संतप्त मुलींनी तहसीलदारांच्या दालनात मागितला न्याय - शासकीय वसतिगृहातील समस्या

वाडी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुला-मुलींसाठी २ स्वतंत्र वसतिगृह आहेत. मुलींच्या वसतिगृहात ग्रामीण भागातील जवळपास ८० विद्यार्थिनी राहतात. या वसतिगृहातील मुलींना अनेक दिवसांपासून दररोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. मात्र, सोमवारी सकाळी दिलेल्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी जेवण घेऊन थेट तहसील कार्यालय गाठून तहसीलदारांकडे तक्रार केली.

girls hostel waijapur
जेवणात अळ्या आढळल्याने संतप्त विद्यार्थिनींनी तहसील कार्याल गाठून तहसिलदारांकडे तक्रार केली
author img

By

Published : Nov 26, 2019, 11:53 AM IST

औरंगाबाद - जिल्ह्यातील वैजापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वसतिगृहात सोमवारी सकाळी दिलेल्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्या. त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थिनींनी हे जेवण घेऊन थेट तहसील कार्यालय गाठले. तहसीलदार विनोद गुंडमवार यांना हे अळ्यायुक्त जेवण दाखवून न्याय देण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली. तसेच तहसीलदार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही या विद्यार्थिनींनी दिला.

जेवणात अळ्या आढळल्याने संतप्त विद्यार्थिनींनी तहसील कार्यालय गाठून तहसिलदारांकडे तक्रार केली

शिवराई रस्त्यावर गायकवाड वाडी परिसरात समाज कल्याण विभागाचे मुला-मुलींसाठी २ स्वतंत्र वसतिगृह आहेत. मुलींच्या वसतिगृहात ग्रामीण भागातील जवळपास ८० विद्यार्थिनी राहतात. या वस्तीगृहातील मुलींना मुलभूत सुविधा मिळत नसून येथे कायमस्वरूपी गृहपाल उपलब्ध नाहीत तर, रात्रीच्या वेळी पुरुष सुरक्षारक्षक असतात. तसेच अनेक दिवसांपासून दररोज निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना कळवूनही ते लक्ष देत नव्हते. त्यामुळे काही समस्या उद्भवल्यास मुली त्या सांगू शकत नाही. तसेच इतरही अनेक सुविधा वसतिगृहात मिळत नसल्याचे विद्यार्थिनींनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - धक्कादायक! औरंगाबादमध्ये पैशाच्या वादातून चाकूने भोसकून मैत्रिणीची हत्या

अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही आम्हाला चांगले जेवण मिळत नव्हते आणि सोमवारी तर जेवणात अळ्याच निघाल्या. यामुळे मुलभूत सुविधा व चांगले जेवण न मिळाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण करण्याचा इशारा मुलींनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर स्नेहल साखरे, रोहिणी सावंत, सरू म्हसे, मनीषा दांडेकर, ज्योती किरवले, सुरभी पाटील आदी मुलींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा - राज्यातील 50 हजार शिक्षकांना मोबाईलवर 'स्पोकन इंग्लिश'चे प्रशिक्षण

Intro:धक्कादायक वैजापूर येथील शासकीय वसतिगृहात मुलीच्या जेवणात आढळल्या अळ्या.
संतप्त मुलींनी तहसीलदार यांच्या दालनात मागितला न्याय.

वैजापूर येथील डाँ बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलींच्या वस्तीगृहात सोमवारी सकाळी दिलेल्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्या.त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थीनींनी हे जेवण घेऊन थेट तहसिल कार्यालय गाठले.तहसिल कार्यालयात तहसीलदार विनोद गुंडमवार यांना हे अळ्यायुक्त जेवण दाखवून न्याय देण्याची मागणी त्यांनी केली. तहसीलदार यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचत न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा विद्यार्थीनींनी दिला.Body:शिवराई रस्त्यावर गायकवाड वाडी परीसरात समाज कल्याण विभागाचे मुलांमुलीसाठी दोन स्वतंत्र वस्तीगृह आहेत.मुलींच्या वस्तीगृहात ग्रामीण भागातील जवळपास ८० विद्यार्थीनी राहतात.या वस्तीगृहातील मुलींना मुलभूत सुविधा मिळत नाही. तसेच अनेक दिवसापासून दररोज निकृष्ठ जेवण मिळते.संबंधीत अधिकाऱ्यांना कळवूनही ते लक्ष देत नाही. या वस्तीगृहात सध्या कायम स्वरूपी गृहपाल उपलब्ध नाही.रात्रीच्या वेळी येथे पुरूष सुरक्षा रक्षक असतात.त्यामुळे काही समस्या उद्भवल्यास मुली त्या सांगू शकत नाही. इतरही अनेक सुविधा वस्तीगृहात मिळत नसल्याचे विद्यार्थीनींनी यावेळी सांगीतले.Conclusion:सोमवारी तर जेवणात अळ्या निघाल्या.मुलभूत सुविधा व चांगले जेवण न मिळाल्यास डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर उपोषण करण्याचा इशारा मुलींनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. निवेदनावर स्नेहल साखरे,रोहीणी सावंत,सरू म्हसे,मनीषा दांडेकर,ज्योती किरवले,सुरभी पाटील आदी मुलींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.